मनसेच्या आवाहनाला ‘फ्लिपकार्ट’कडून प्रतिसाद, ‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा समावेश

मराठीच्या उपयोगासाठी पुढाकार घेणार्‍या मनसेचे अभिनंदन !

मुंबई – ‘फ्लिपकार्ट’ या वस्तूंच्या ऑनलाईन विक्री करणार्‍या आस्थापनाने त्यांच्या ‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा समावेश केला आहे. ‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, यासाठी ऑक्टोबर २०२० मध्ये मनसेकडून ‘फ्लिपकार्ट’ला आवाहन करण्यात आले होते. त्या वेळी ‘फ्लिपकार्ट’कडून ‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन मनसेला दिले होते. त्यानुसार ‘फ्लिपकार्ट’कडून ही कार्यवाही करण्यात आली आहे.