संभाजीनगर येथे राज ठाकरे यांच्या सभेची ठरलेल्या जागीच जय्यत सिद्धता !

२४ एप्रिल या दिवशी येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील व्यासपिठाची मनसैनिकांकडून विधीवत् पूजा करण्यात आली. त्यानंतर आता सभेसाठी सिद्धता करण्यात येत आहे.

(म्हणे) ‘दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे उदात्तीकरण करणारे राज ठाकरे यांनी क्षमा मागावी !’ – तथाकथित विचारवंत श्रीमंत कोकाटे यांची मागणी

आतापर्यंत खोटा इतिहास सांगून समाजाची दिशाभूल केल्याविषयी कोकाटे यांनीच समस्त हिंदूंची क्षमा मागायला हवी !

मंदिरांप्रमाणे मशिदींमध्येही ‘सीसीटीव्ही’ छायाचित्रक लावा ! – बाळा नांदगावकर, मनसे

मंदिरांप्रमाणे मशिदींमध्येही ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावा, असे ट्वीट  मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे.

मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीत, तर मशिदींसमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावणारच ! – दिलीप दातीर, नाशिक शहराध्यक्ष, मनसे

मशिदींवरील भोंग्यावरून अजान दिली जात असल्याने राज ठाकरे यांनी भोंगे खाली उतरवण्यासाठी ३ मेपर्यंतची समयमर्यादा दिली आहे. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण तणावपूर्ण झाले आहे.

राज ठाकरे यांच्या संभाजीनगर येथील सभेला ५ हून अधिक संघटनांचा विरोध !

मुस्लिम नुमाइंदा कौन्सिल, वंचित बहुजन आघाडी, मौलाना आझाद विचार मंच, ऑल इंडिया पँथर सेना, प्रहार जनशक्ती पक्ष, गब्बर ॲक्शन संघटना. या संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी ‘राज ठाकरे यांच्या सभेमुळे शहरातील धार्मिक सलोखा बिघडू शकतो.

उद्दाम धर्मांध !

भोंग्यांच्या संदर्भातील सूत्र ही चूक धर्मांधांची असतांना त्यांना ‘पीडित’ म्हणून आणि हिंदूंना ‘पीडा देणारे’ म्हणून रंगवण्याचे षड्यंत्र भारतातील काही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी मंडळी रचतांना दिसत आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात धर्मांधांकडून हिंदूंवर आणखी आक्रमणे झाल्यास आणि त्याचे खापर हिंदूंवरच फुटल्यास आश्चर्य वाटणार नाही.

राज ठाकरे यांनी त्यांचे हिंदुत्वाचे सूत्र प्रभावीपणे पुढे केल्यामुळे इतरांना पोटशूळ ! – परशुराम उपरकर, मनसे

एका हिंदुत्वनिष्ठ पक्षाने हिंदुत्वाची कास सोडल्यामुळे राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा विषय जो बाळासाहेबांनी उचलून धरला होता, त्याचे समर्थन केल्याने इतरांना डोकेदुखी झाली आहे.

आदित्य ठाकरे मे मासात, तर राज ठाकरे जून मासात अयोध्या येथे जाणार !

आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी १९ एप्रिल या दिवशी शिवसेना भवन येथे संजय राऊत आणि वरुण सरदेसाई यांच्यात बैठक झाली, तसेच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेची बैठक झाली.

अक्षय्य तृतीयेला राज्यभरातील मंदिरांमध्ये मनसे कार्यकर्ते महाआरती करणार !

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर ३ मे या दिवशी राज्यभरातील स्थानिक मंदिरांमध्ये मनसे कार्यकर्ते महाआरती करणार आहेत.

घटनाद्रोही आदेश !

‘नाशिक येथे मनसेचा अधिक जोर असल्याने असे करण्यात आले आहे का ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठी नाशिक पोलीस हिंदूंनाच दाबण्याचा प्रयत्न याद्वारे करत आहेत. त्यामुळे हा अन्याय रोखण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणे अपरिहार्यच आहे !