संभाजीनगर येथे १ मे या दिवशी राज ठाकरे यांची, तर मुंबई येथे देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा !

१ मे म्हणजे महाराष्ट्रदिनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची संभाजीनगर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेला घेरण्यासाठी भाजपच्या वतीने महाराष्ट्रदिनी मुंबई येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.

राज ठाकरे यांच्याकडून खालकर चौक (पुणे) येथील हनुमान मंदिरात महाआरती !

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून १६ एप्रिल या दिवशी खालकर चौक येथील हनुमान मंदिरात सामूहिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या वेळी खालकर चौकात शेकडो पुणेकर जमले होते.

असे बोलण्याचे धाडस होतेच कसे ?

एकाही भोंग्याला हात लावलात, तर आम्ही विरोध करायला सर्वांत पुढे असू, ‘छेडोगे तो छोडेंगे नहीं’, हे आमचे घोषवाक्य आहे, अशी चेतावणी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे मुंब्रा येथील अध्यक्ष मतीन शेखानी यांनी मनसेला दिली आहे.

स्वत:ची चूक वाटत असेल, तर शरद पवार यांनी महाराष्ट्राची क्षमा मागावी !

राज ठाकरे त्यांच्या भाषणात ‘राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून जातीजातींत भांडणे लावण्याचे काम करण्यात आले’, असे जे म्हणाले, त्याचा ढळढळीत पुरावा या पत्रापेक्षा दुसरा कुठला असू शकत नाही !

तलवार दाखवल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांवरही गुन्हा  नोंद करा ! – अविनाश जाधव, अध्यक्ष ठाणे आणि पालघर मनसे

महाराष्ट्रात अनेक नेत्यांनी व्यासपिठांवर, तसेच सभेमध्ये तलवारी दाखवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याही विरोधात गुन्हा नोंद झाला नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, अशी चेतावणी जाधव यांनी दिली आहे.

ठाणे येथील सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा प्रविष्ट !

सभेसाठी राज ठाकरे उपस्थित होतांना त्यांचे कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जोरदार स्वागत केले. तेव्हा सभेचे आयोजन करणाऱ्या मनसैनिकांनी राज ठाकरे यांच्याकडे तलवार सुपुर्द करत ती उपस्थितांना दाखवण्याचे आवाहन केले.

३ मेपर्यंत देशभरात मशिदींवरील भोंगे उतरवले गेलेच पाहिजेत !

३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवलेच गेले पाहिजेत. ३ तारखेपर्यंत भोंगे उतरवले गेले नाहीत, तर अख्ख्या देशभर हनुमान चालिसा लागली पाहिजे, अशी चेतावणी १२ एप्रिल या दिवशी ठाणे येथील सभेत बोलतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.

हिंदु महासंघाकडून मनसेचे तत्कालीन शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या विरोधात निषेध आंदोलन !

येथील कात्रज तलावाच्या जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून हिंदु महासंघाने मनसेचे तत्कालीन शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या विरोधात १० एप्रिल या दिवशी आंदोलन केले.

मनसेच्या मुंब्रा येथील कार्यालयावर दगडफेक !

मनसेच्या वाहतूक सेनेच्या ‘राजगड’ या कार्यालयाला लावलेला पक्षाचा फलक उतरवण्यासाठी रात्री १२ पर्यंतचा कालावधी दिला होता; मात्र फलक न उतरवल्याने ८ एप्रिल या दिवशी मनसेच्या राजगड कार्यालयावर दगडफेक करण्यात आली.

नागपूर येथील सर्व मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवा, अन्यथा आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसाचे पठण करू !

पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे मनसेची चेतावणी !