राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : १२ डिसेंबर २०२१

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत.

‘उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डा’चे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी स्वीकारला हिंदु धर्म !

‘उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डा’चे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी येथील डासनादेवी मंदिरात जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर नरसिंहानंद गिरि सरस्वती यांच्या उपस्थितीत हिंदु धर्मात प्रवेश केला.

आसामध्ये आम्ही अनुमाने ७०० मदरसे बंद केलेत, तर उर्वरित मदरशांमध्ये शाळा आणि महाविद्यालय चालू करणार ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसाममधील भाजपच्या सरकारचे मुख्यमंत्री असे करू शकतात, तर देशातील अन्य भाजपशासित राज्यांतही असे करायला हवे, असेच हिंदूंना वाटते !

जिहादी आतंकवादी मदरशांतून निर्माण होत असल्याने मला संधी मिळाली, तर सर्व मदरसे बंद करीन ! – उत्तरप्रदेशातील राज्यमंत्री ठाकूर रघुराज सिंह

उत्तरप्रदेश सरकारकडून मदरशांना दिले जाणारे अनुदान प्रथम बंद केले पाहिजे. त्यासाठी रघुराज सिंह यांनी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

भारत-नेपाळ सीमेवर गेल्या २ दशकांत मशिदी आणि मदरसे यांच्या संख्येत ४ पटींनी वाढ !

सीमेवरील राज्ये मुसलमानबहुल करून ती भारतापासून तोडण्याचे हे षड्यंत्र आहे, हे शासनकर्ते लक्षात घेतील का ?

यांच्यावर कधी कारवाई होणार ?

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या गोपनीय माहितीनुसार भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवर गेल्या २० वर्षांत मशिदी आणि मदरसे यांच्या संख्येत ४ पट वाढ झाली आहे.

बांगलादेशमध्ये रोहिंग्या निर्वासितांच्या छावणीवर झालेल्या गोळीबारात ७ जणांचा मृत्यू

बांगलादेशातील निर्वासित रोहिंग्यांच्या छावणीवर अज्ञातांकडून झालेल्या गोळीबारात ७ जणांचा मृत्यू झाला. उखिया येथील कॅम्प क्रमांक १८ च्या ब्लॉक एच्-५२ मधील मदरशावर अज्ञात व्यक्तींनी पहाटे ४ वाजता आक्रमण केले.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे मौलवीकडून मदरशातील विद्यार्थिनीवर बलात्कार !

असे वासनांध मौलवी असलेल्या मदरशांमधून विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिक्षण मिळत असेल ? याचा विचारच न केलेला बरा !

नेपाळला लागून असलेल्या भारतीय जिल्ह्यांमध्ये धर्मांधांच्या लोकसंख्येत अडीच पटींनी वाढ !

गेल्या अनेक वर्षांपासून भारताची पुन्हा एक फाळणी करण्याचा सुनियोजित प्रयत्न चालू आहे. त्यामुळे राष्ट्रद्रोही शक्तींकडून बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या यांची बाजू घेऊन लोकसंख्या नियंत्रण विधेयकालाही विरोध करण्यात आला होता, हे जाणा !

धर्मनिरपेक्ष राज्यात धार्मिक शिक्षण देणार्‍या मदरशांना आर्थिक साहाय्य देऊ शकतो का ?  

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा उत्तरप्रदेश सरकारला प्रश्‍न