आसामध्ये आम्ही अनुमाने ७०० मदरसे बंद केलेत, तर उर्वरित मदरशांमध्ये शाळा आणि महाविद्यालय चालू करणार ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसाममधील भाजपच्या सरकारचे मुख्यमंत्री असे करू शकतात, तर देशातील अन्य भाजपशासित राज्यांतही असे करायला हवे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

गौहत्ती (आसाम) – राज्यातील मदरसे बंद करण्याचा आमचा उद्देश आहे. आम्ही आतापर्यंत अनुमाने ७०० मरदसे बंद केले आहेत. उर्वरित मदरशांचे नर्सिंग स्कूल, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय यांत रूपांतरित करण्याचा विचार आहे. मला वाटते की, मुसलमानांनी मदरशांमध्ये न जाता आधुनि वैद्य (डॉक्टर) आणि अभियंता बनावे आणि समाजाला साहाय्य करावे. मी मुसलमानांच्या समाजाच्या हितासाठीच मदरसे बंद केले आहेत, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केले.

सरमा पुढे म्हणाले की, मी जर मुसलमानांना सांगितले की, ‘मला मत द्या’, तर ते मला मत देतील का ? मला पक्के ठाऊक आहे की, ते मला मत देणार नाहीत. मग मी त्यांना मत का मागू ? ज्या वेळी मुसलमान मुले मोठी होऊन डॉक्टर किंवा अभियंता बनतील, तेव्हा ते मला निश्‍चितच मत देतील; परंतु आज तरी तशी स्थिती नाही.