जिहादी आतंकवादी मदरशांतून निर्माण होत असल्याने मला संधी मिळाली, तर सर्व मदरसे बंद करीन ! – उत्तरप्रदेशातील राज्यमंत्री ठाकूर रघुराज सिंह

उत्तरप्रदेशामध्ये मदरशांची संख्या २५० वरून २२ सहस्र झाल्याचाही दावा

उत्तरप्रदेश सरकारकडून मदरशांना दिले जाणारे अनुदान प्रथम बंद केले पाहिजे. त्यासाठी रघुराज सिंह यांनी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

उजवीकडे राज्यमंत्री ठाकूर रघुराज सिंह

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – देशात जितके मदरसे चालत आहेत, तेथे आतंकवादाची वाढ होत आहे. ती आतंकवादी केंद्रे बनली आहेत. सर्व आतंकवादी हे मदरशांतून शिकून बाहेर पडत आहेत. देवाने मला संधी दिली, तर देशातील सर्व मदरसे बंद केले जातील, असे विधान उत्तरप्रदेश सरकारमधील राज्यमंत्री ठाकूर रघुराज सिंह यांनी केले आहे. त्यांच्या विधानाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

रघुराज सिंह पुढे म्हणाले की, ज्या प्रमाणे नागाचा फणा ठेचला जातो, तसेच आतंकवादाचे डोके ठेचले पाहिजे. राज्यातील मदरशांची संख्या गतीने वाढत आहे. पूर्वी उत्तरप्रदेशातील मदरशांची सख्या केवळ २५० होती; मात्र आता ती वाढून २२ सहस्र इतकी झाली आहे. केंद्र सरकारने यांवर बंदी घातली पाहिजे.