नेपाळला लागून असलेल्या भारतीय जिल्ह्यांमध्ये धर्मांधांच्या लोकसंख्येत अडीच पटींनी वाढ !

  • पंथनिहाय लोकसंख्येचा समतोल बिघडवून भारताच्या फाळणीचे षड्यंत्र

  • केवळ उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेलगत २ वर्षांमध्ये ४०० मदरसे आणि मशिदी उभारल्या !

  • बांगलादेशपासून पाकिस्तानपर्यंत धर्मांधबहुल क्षेत्रांची केली जात आहे निर्मिती

  • गेल्या अनेक वर्षांपासून भारताची पुन्हा एक फाळणी करण्याचा सुनियोजित प्रयत्न चालू आहे. त्यामुळे राष्ट्रद्रोही शक्तींकडून बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या यांची बाजू घेऊन लोकसंख्या नियंत्रण विधेयकालाही विरोध करण्यात आला होता, हे जाणा ! – संपादक
  • ही स्थिती चिंताजनक असून भारताची आणखी एक फाळणी होण्याआधीच हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! – संपादक

डेहराडून (उत्तराखंड) – नेपाळला लागून असलेल्या भारताच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये धर्मांधांची लोकसंख्या अडीच पटींनी वाढली आहे. तसेच तेथे केवळ २ वर्षांत ४०० हून अधिक मदरसे आणि मशिदी यांची निर्मिती करण्यात आली आहे, असा दावा एका अहवालामध्ये करण्यात आला आहे. या माध्यमातून पंथनिहाय लोकसंख्येचा समतोल बिघडवून (‘डेमोग्रॅफिक इम्बॅलेंस’ करून) भारताच्या फाळणीचे षड्यंत्र रचण्यात आल्याचेही म्हणण्यात आले आहे.

१. उत्तराखंडच्या अनेक क्षेत्रांमध्ये धर्मांधांच्या लोकसंख्या वाढीमागे एक विशिष्ट षड्यंत्र दिसत असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. त्यानंतर त्यांनी या वर्षीच्या प्रारंभी गृह मंत्रालयाला हा अहवाल पाठवला होता. त्यामध्ये संवेदनशील प्रदेशांची माहिती देण्यात आली होती.

२. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ज्या जिल्ह्यांची नावे या अहवालामध्ये देण्यात आली आहेत, तेथील लोकसंख्येमधील पालट हा आता झाला नसून वर्ष २०११ मध्ये झालेल्या जनगणनेमध्येच झाल्याची नोंद करण्यात आली होती. (यातून गेल्या १० वर्षांत स्थिती आणखी किती बिकट झाली असेल, याची कल्पना करता येणार नाही ! – संपादक)

३. सुरक्षा यंत्रणांनी गृहमंत्रालयाला दिलेल्या अहवालामध्ये नेपाळ सीमेशी लागून असलेले उत्तराखंड राज्यातील उधमसिंह नगर, चंपावत आणि पिथोरागड हे जिल्हे संवेदनशील असल्याचे म्हटले होते. त्यातही पिथोरागडच्या धारचूला आणि जौलजीबी या दोन गावांना अतीसंवेदनशील श्रेणीमध्ये ठेवण्यात आले होते. असाच पालट आता उत्तराखंड राज्याच्या नैनितालमध्येही पहायला मिळत आहे.

४. उत्तराखंडच्या सीमावर्ती भागांखेरीज उत्तरप्रदेशातील अनेक क्षेत्रांनाही सतर्कतेची चेतावणी देण्यात आली होती; कारण मागील २ वर्षांमध्ये राज्यातील बस्ती आणि गोरखपूर विभागांना लागून असलेल्या नेपाळ सीमेवर ४०० हून अधिक मदरसे अन् मशिदी उभारण्यात आल्या आहेत. याचीही माहिती या अहवालामध्ये देण्यात आली आहे.

५. उत्तराखंड राज्याचे पोलीस महासंचालक डॉ. नीलेश आनंद भरणे यांनी सांगितले की, लोकसंख्येच्या या पालटाविषयी सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये चेतावणी देण्यात आली आहे. गुप्तचर संस्था सर्व दृष्टीकोनांतून अन्वेषण करत आहेत.

६. दैनिक ‘जागरण’ने दिलेल्या एका माहितीनुसार सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्या अहवालामध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे बांगलादेश, बिहार, नेपाळ, उत्तरप्रदेश, हरियाणा आणि पंजाब या राज्यांमध्ये सुनियोजित पद्धतीने धर्मांधांकडून ‘कॉरीडॉर’ निर्माण करण्यात येत आहे. तेेथे मागील १० वर्षांमध्ये शरणार्थींच्या नावाने समुदाय विशेषची (धर्मांधांची) लोकसंख्या स्थलांतरीत करण्यात आली आहे. या अहवालामध्ये हा ‘कॉरीडॉर’ पाकिस्तानशी जोडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. (वर्ष २००५ मध्ये प्रसिद्ध पत्रकार मयांक जैन यांच्या ‘बांगला क्रिसेंट’ या लघुपटाच्या माध्यमातूनही त्यांनी या षड्यंत्राविषयी विविध सरकारी अधिकारी यांच्या हवाल्याने माहिती दिली आहे. या क्षेत्राला ‘ग्रीन कॉरिडॉर’ म्हणण्यात आले आहे. यातून भारतासमोरील आव्हानांची भयावहता स्पष्ट होऊ शकते. यावर हिंदूसंघटन हाच एकमेव उपाय असल्याचे जाणा ! – संपादक)

७. सुरक्षा यंत्रणांचा दावा आहे की, पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएस्आय’ नेपाळच्या मार्गाने भारतामध्ये सक्रीय आहे.

८. याविषयी उत्तराखंडचे भाजपचे माजी प्रदेश महामंत्री गजराज सिंह बिष्ट म्हणाले, ‘‘प्रारंभी धर्मांध तुमचे पाय धरण्यासाठी येतील, नंतर हात जोडतील आणि विनंती करतील; परंतु जेव्हा ते १ वरून १० होतात, तेव्हा तुम्ही त्यांच्या गल्लीत पायही ठेवू शकत नाही.’’ (भारतभरात हेच अनुभवायला येत आहे ! – संपादक)