राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : १२ डिसेंबर २०२१

खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

आसाममध्ये आम्ही अनुमाने ७०० मदरसे बंद केले ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

‘आसाम राज्यातील मदरसे बंद करण्याचा आमचा उद्देश आहे. आम्ही आतापर्यंत अनुमाने ७०० मदरसे बंद केले आहेत. उर्वरित मदरशांचे परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय यांत रूपांतरित करण्याचा विचार आहे. मला वाटते की, मुसलमानांनी मदरशांमध्ये न जाता आधुनिक वैद्य (डॉक्टर) आणि अभियंता बनावे अन् समाजाला साहाय्य करावे. मी मुसलमानांच्या समाजाच्या हितासाठीच मदरसे बंद केले आहेत, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केले.’


तमिळनाडूमध्ये सरकारी नोकरी मिळण्यासाठी आता तमिळ भाषेची प्रश्नपत्रिका सोडवणे अनिवार्य !

भाषा जपण्यासाठी तमिळनाडू सरकारने घेतलेला निर्णय महाराष्ट्रानेही घ्यावा, असेच मराठी जनांना वाटते ! – संपादक 

‘तमिळनाडू सरकारने सरकारी नोकरी मिळण्यासाठी परीक्षा देणार्‍या परीक्षार्थींना आता तमिळ भाषेची प्रश्नपत्रिका सोडवणे अनिवार्य केले आहे. या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास परीक्षार्थींच्या अन्य उत्तरपत्रिका तपासल्या जाणार नाहीत, असे सरकारने आदेशात स्पष्ट केले आहे.’


श्रीपेरुंबुदूर (तमिळनाडू) येथील श्री कनक कालीश्वर मंदिर प्रशासनाने पाडले !

सरकारी भूमीवर मंदिर बांधल्याचा आरोप

सरकारी भूमीवर बांधण्यात आलेल्या मशिदी आणि अन्य अतिक्रमणे पाडण्याचे धाडस प्रशासन कधी दाखवत का नाही ? हिंदू सहिष्णु असल्याने त्यांच्यावर दडपशाही करणारे नास्तिकतावादी तमिळनाडू सरकार हिंदुद्वेषीच होत ! – संपादक 

‘श्रीपेरुंबुदूर (तमिळनाडू) येथील श्री कनक कालीश्वर मंदिर हे सरकारी भूमीवर अतिक्रमण करून बांधले असल्याचा आरोप करत प्रशासनाने ते पाडले. ‘प्रशासनाने आम्हाला मंदिरातील मूर्ती बाहेर काढण्यासही वेळ दिला नाही, तसेच मंदिर पाडण्याची कोणतीही नोटीस दिली नाही. तडजोडीसाठी भाविक जिल्हाधिकार्‍यांना भेटायला गेले असतांनाही महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी मंदिर पाडले. ‘गर्भगृह पाडणार नाही’, असे आश्वासन भाविकांना देऊनही अधिकार्‍यांनी तेही पाडले’, असे आरोप भाविकांनी केले. त्यामुळे भाविकांनी याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.’

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी केलेले अत्याचार यांच्या या आठवड्यात झालेल्या घटना

१. रोहतक (हरियाणा) येथे विवाह आटोपून सासरी निघालेल्या नववधूवर धर्मांधाकडून गोळीबार : नववधूची प्रकृती चिंताजनक !

२. नगरमध्ये (महाराष्ट्र) विवाहित धर्मांधाचा दलित मुलीवर बलात्कार  : धर्मांतरासाठी युवतीला मारहाण केली !

३. धर्मांधाने ‘राजेश यादव’ बनून हिंदु मुलीला फसवले आणि तिचे बलपूर्वक धर्मांतर करून लग्न केले !

४. धर्मांधाने हिंदु बनून युवतीशी लग्न केले आणि लैंगिक शोषण करून तिला सोडून दिले : धर्मांतरासाठी युवतीला मारहाण केली !

५. कटिहार (बिहार) मध्ये धर्मांधाकडून दलित महिलेचे अपहरण करून बलपूर्वक धर्मांतर : आरोपीने मुलाची हत्या करण्याची धमकी देत पीडितेवर केला बलात्कार !