भारत-नेपाळ सीमेवर गेल्या २ दशकांत मशिदी आणि मदरसे यांच्या संख्येत ४ पटींनी वाढ !

गुप्तचरांचे लक्ष, तर सुरक्षायंत्रणा सतर्क !

  • मदरसे आणि मशिदी ४ पटींनी वाढेपर्यंत पोलीस, सुरक्षायंत्रणा आणि प्रशासन झोपले होते का ? आताही अशांवर कारवाई का केली जात नाही ? – संपादक
  • सीमेवर मंदिरे असतील, तर त्यांच्यावर असे लक्ष ठेवावे लागत नाही, यांविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी सांगतील का ? – संपादक
  • सीमेवरील धर्माधांची वाढती संख्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील मोठे आव्हान ! – संपादक
भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवर गेल्या २० वर्षांत मशिदी आणि मदरसे यांच्या संख्येत ४ पटींनी वाढ

नवी देहली – गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या गोपनीय माहितीनुसार भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवर गेल्या २० वर्षांत मशिदी आणि मदरसे यांच्या संख्येत ४ पटींनी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस सतर्क असून या मशिदी आणि मदरसे यांवर ते लक्ष ठेवून आहेत. येथून कोणत्याही देशविघातक कारवाया होऊ नयेत, यासाठीही ते सतर्क आहेत. यांसह या मशिदी आणि मदरसे यांची चौकशीही चालू केली आहे.

१. सीमेवरील सिद्धार्थनगर (उत्तरप्रदेश) जिल्ह्यामध्ये ५९७ मदरसे आहेत. त्यांतील ४५२ नोंदणीकृत आहेत, तर १४५ मदरशांची कोणतीही नोंदणी नाही. आता गुप्तचर यंत्रणा नोंदणी नसलेले मदरसे कोण आणि कशा प्रकारे चालवत आहेत ? त्यांना अर्थपुरवठा कोण करत आहे ? आदींची चौकशी करत आहेत. या मदरशांना दुबई आणि आखाती देश येथून पैसे मिळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वर्ष १९९० पर्यंत येथे केवळ १६ मान्यताप्राप्त मदरसे होते. वर्ष २००० मध्ये त्यांची संख्या १४७ झाली. त्यांतही केवळ ४५ मदरसेच मान्यताप्राप्त होते.

२. जिल्हा अल्पसंख्यांक कल्याण अधिकारी तन्मय कुमार यांनी सांगितले की, मदरसा कुणीही उघडू शकतो. शासनाकडून मान्यताप्राप्त मदरशांना अनुदान दिले जाते. (मदरशांमधून आतंकवादी, बलात्कारी, आदी गुन्हेगारी कारवाया करणारे निपजत असतांना कुणालाही मदरसे उघडायला अनुमती देणे आणि अनुदान देणे कितपत योग्य ? – संपादक)

३. सशस्त्र सुरक्षादलाच्या ४३ व्या वाहिनीचे उप कमांडंट मनोज कुमार यांनी सांगितले की, ज्या मदरशांची नोंदणी नाही, त्यांच्यावर लक्ष ठेवले जात असून त्यांची माहिती सरकारला दिली जात आहे.

४. नेपाळमध्ये सीमेवरील जिल्ह्यांमध्ये मुसलमानांच्या लोकसंख्येत अडीच पटींनी वाढ झाली आहे, तसेच २ वर्षांतच येथे ४०० मशिदी आणि मदरसे बांधण्यात आले आहेत. (सीमेवरील राज्ये मुसलमानबहुल करून ती भारतापासून तोडण्याचे हे षड्यंत्र आहे, हे शासनकर्ते लक्षात घेतील का ?- संपादक)