बांगलादेशमध्ये रोहिंग्या निर्वासितांच्या छावणीवर झालेल्या गोळीबारात ७ जणांचा मृत्यू

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील निर्वासित रोहिंग्यांच्या छावणीवर अज्ञातांकडून झालेल्या गोळीबारात ७ जणांचा मृत्यू झाला. उखिया येथील कॅम्प क्रमांक १८ च्या ब्लॉक एच्-५२ मधील मदरशावर अज्ञात व्यक्तींनी पहाटे ४ वाजता आक्रमण केले. या आक्रमणाचा उल्लेख २ प्रतिस्पर्धी रोहिंग्या गटांमधील संघर्ष म्हणून करण्यात येत आहे. पोलिसांनी एका आक्रमणकर्त्याला बंदूक आणि दारूगोळा यांसह अटक केली आहे. इतर आरोपींना पकडण्यासाठी छावणीमध्ये धाडी टाकण्यात येत आहेत.