निवडणूक कामकाजामुळे काही मार्गावरील राज्य परिवहन सेवा विस्कळीत होण्याची शक्यता !

नागरिकांनी सहकार्य करण्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आवाहन

प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाने राष्ट्रहितार्थ मतदान करणे, हे राष्ट्रीय कर्तव्य !

राष्ट्रहितार्थ कार्य करणार्‍या उमेदवाराला मत देणे, हे सूज्ञ नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. ते पार पाडण्यासाठी राष्ट्रप्रेमींनी मोठ्या प्रमाणात मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले पाहिजे !

निवडणुकीचा प्रचार कि उणीदुणी काढण्याची स्पर्धा ?

जनता सूज्ञ असल्याने ती  योग्य उमेदवार निवडून आणेल; मात्र सध्याच्या राजकीय सभांतून केल्या जाणार्‍या टीकाटिपणीशी, आरोप-प्रत्यारोपांशी सामान्य जनतेला काहीच देणे-घेणे नाही, हेच खरे !

हिंदुस्थानच्या विरोधात अमेरिकी प्रसारमाध्यमांचा थयथयाट !

हिंदूंचा आत्मविश्वास नष्ट करून त्यांच्यात फूट पाडण्यासाठी केला जाणारा प्रयत्न हिंदूंनी संघटित होऊन हाणून पाडला पाहिजे !

भाजप लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

भाजपने मन्युष्यबळ आणि साधनसुविधा यांचा विकास करण्याचे ध्येय ठेवले आहे, तसेच भाजपने अनुसूचित जमातीलाही योग्य न्याय दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक वेळी गोव्याकडे विशेष लक्ष दिलेले आहे.

उभादांडावासियांकडून लोकसभा निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागे

भादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलकडे जाण्या-येण्याच्या मार्गावर झाडांची लागवड आणि सांडपाण्याचा चिखल यांमुळे विद्यार्थी अन् शिक्षक यांना त्रास होत आहे.

पळशी (जिल्हा जालना) येथे महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची !

जालना लोकसभा मतदारसंघात असलेल्या पळशी गावात प्रचारासाठी गेलेले रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि विधान परिषदेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी अडवले.

महायुतीमध्ये असलो तरी शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा सोडली नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महायुतीची प्रचार सभा झाली त्यात ते बोलत होते.

सध्याच्या निवडणुका विकास विरुद्ध विद्वेष अशा होत आहेत ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

महायुतीने गेल्या १० वर्षांत प्रचंड विकासकामे केली आहेत. असे असतांना लोकसभा निवडणुकीतील प्रचारात सध्या वैयक्तिक टीका मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यामुळे सध्याच्या निवडणुका विकास विरुद्ध विद्वेष, अशा होत आहेत.

बीड येथे चारचाकी वाहनातून १ कोटी रुपयांची रक्कम जप्त !

४ मे या दिवशी जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील खामगाव येथील पडताळणी नाक्यावर पडताळणी करत असतांना चारचाकी वाहनात १ कोटी रुपयांची रक्कम सापडली आहे.