पुणे – अजित पवार यांची बैठक पुरोगामी विचारसरणीची आहे. भारतीय जनता पक्षासोबत जाण्याच्या निर्णयावर अजित पवार यांची विचारधारा काय ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोर येथील सभेत भाष्य केले. महायुतीमध्ये असलो तरी, शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महायुतीची प्रचार सभा झाली त्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भोरची लोकसंख्या न्यून का होत आहे ? सत्ता असतांना विकास करायला काय झाले ? महायुतीचा खासदार निवडून दिला तर पुढच्या ५ वर्षांत भोरचा चेहरामोहरा पालटेल. आम्हाला बहुमत द्या.