प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाने राष्ट्रहितार्थ मतदान करणे, हे राष्ट्रीय कर्तव्य !

आज ७ मे या दिवशी गोवा, महाराष्ट्र यांसह देशभरात होत असलेल्या मतदानाच्या निमित्ताने…

‘लोकसभा निवडणूक २०२४’ यासाठी विविध राजकीय पक्षांनी त्यांची घोषणापत्रे बनवली आहेत. हिंदुविरोधी पक्षांची घोषणापत्रे वाचल्यावर लक्षात येते की, भारतात अल्पसंख्यांकांना विरोधी पक्ष जिंकून आल्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा, सवलती देण्यासह इस्लामधार्जिणे कायदे बनवण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाणार आहे.  मुसलमानधार्जिण्या पक्षांनी तर ‘जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० परत आणू’, असेही घोषित केले आहे. एवढेच नव्हे, तर साम्यवादी पक्षांनी ‘देशातील अण्वस्त्रांची संख्या न्यून करून पाकिस्तानशी पुन्हा चर्चा चालू करू’, अशा देशविघातक घोषणा केल्या आहेत.

सूज्ञ नागरिकांनो, हे लक्षात घेऊन राष्ट्रहितार्थ मतदान करतांना खालील सूत्रे लक्षात ठेवा !

१. लव्ह जिहाद, भूमी जिहाद आदी विविध जिहाद संपुष्टात आणण्यासाठी धडाडीने कारवाई करणारा

२. भारताची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा यांना प्राधान्य देणारा

३. भारतात संपूर्ण गोहत्याबंदी आणून गोसंवर्धन करणारा

४. घुसखोरांवर हाकलून भारत घुसखोरमुक्त करणारा

अशा राष्ट्रहितार्थ कार्य करणार्‍या उमेदवाराला मत देणे, हे सूज्ञ नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. ते पार पाडण्यासाठी राष्ट्रप्रेमींनी मोठ्या प्रमाणात मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले पाहिजे !