लोकसभा निवडणुका : तिसर्‍या टप्प्यात देशभरात सरासरी ६२ टक्क्यांहून अधिक मतदान !

७ मे या दिवशी लोकसभा निवडणुकांचा तिसरा टप्पा पार पडला. यांतर्गत देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश येथील ९३ लोकसभा जागांसाठी मतदान करण्यात आले.

अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलला !

देहली न्यायालयाने ७ मे या दिवशी दारू घोटाळ्याच्या प्रकरणी देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २० मेपर्यंत वाढ केली.

वरसईसह (रायगड) इतर ६ गावांतील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार !

बाळगंगा धरण प्रकल्पातील ग्रामस्थांना योग्य मोबदला मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्त अप्रसन्न !

पुणे जिल्ह्यातील लोकसभेचे उमेदवार मोहोळ, धंगेकर, बारणे आणि वाघेरे यांना निवडणूक आयोगाची नोटीस !

उमेदवारांनी केलेल्या प्रचार व्ययाची दुसरी पडताळणी ६ मे या दिवशी पार पडली. आतापर्यंत रवींद्र धंगेकर यांच्या व्यय हिशोबामध्ये ११ लाख ६७ सहस्र ७०९ रुपयांची तफावत आढळून आली.

बारामतीत मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुटी !

भरपगारी सुटी मिळूनही बारामतीत मतदानाचा टक्का सर्वांत अल्प असणे, हे कशाचे निर्देशक आहे ?

मतदानाच्या तिसर्‍या टप्प्यात ५५ टक्के मतदान : किरकोळ घटना वगळता बहुतांश मतदान शांततेत !

कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी ७ पासून, तसेच दुपारी १२ नंतरही कडक उन्हात अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. कोल्हापूर जिल्ह्यात सायंकाळी ५ पर्यंत ६३.७१ टक्के, तर हातकणंगले मतदारसंघात ६२.१८ टक्के मतदान झाले होते.

PM Modi At Beed : काँग्रेस दलित, मागसवर्गीय यांचे आरक्षण काढून मुसलमानांना देऊ इच्छिते ! – पंतप्रधान मोदी

२६/ ११ च्या आक्रमणाविषयी काँग्रेसच्या नेत्याने धक्कादायक विधाने केली. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ शकत नाही, असे स्पष्ट केले होते; मात्र काँग्रेस धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ इच्छित आहे.

इ.व्ही.एम्. हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंकडे अडीच कोटी रुपयांची मागणी करणार्‍याला पुणे येथून अटक !

आरोपी मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात जेवढे इ.व्ही.एम्. आहेत, ते सर्व ‘हॅक’ करून तुम्हाला हवा तसा निकाल देतो, असे आश्वासन देत अंबादास दानवेंना भ्रमणभाष केला.

पंतप्रधान मोदी स्वत:ला ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणवून घेतात ! – डॉ. शशी थरूर, खासदार, राष्ट्रीय काँग्रेस

थरूर पुढे म्हणाले, ‘‘नोटबंदीचा, जी.एस्.टी.चा फटका व्यावसायिकांना बसला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या. चीनही सीमेवर दबा धरून बसला आहे.

नाशिक येथे श्री शांतीगिरी महाराज अपक्ष लोकसभा लढवण्यावर ठाम !

श्री शांतीगिरी महाराज भक्त परिवाराच्या वतीने ‘जेव्हा राजसत्ता आपले कर्तव्य विसरते, तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावे लागते’ अशी माहिती असलेले मोठे फलक लावण्यात आले आहेत.