मावळमधील (पुणे) ‘वंचित’च्या उमेदवारासह निवडणूक आयोगाची नोटीस !

मावळ लोकसभा मतदारसंघातील ‘वंचित बहुजन आघाडी’च्या उमेदवार माधवी जोशी यांच्या प्रचार खर्चाच्या पहिल्या पडताळणीमध्ये तफावत दिसून आली आहे.

निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या मतदानाच्या आकडेवारीवर विरोधी पक्षांचा आक्षेप (?)

‘केवळ प्रसिद्धीमाध्यमांमध्ये जाऊन कांगावा केल्याने जनतेत संभ्रम निर्माण करता येऊ शकतो; मात्र जनतेचा विश्वास जिंकता येत नाही, तर त्यांनी जनताभिमुख काम करून दाखवावे’, हे भाजपविरोधी पक्षांनी आता लक्षात घ्यायला हवे.’

राज्यघटनेला काँग्रेसचाच धोका होता; म्हणून थेट सर्वाेच्च न्यायालयाने पाचर मारून ठेवली !

‘पंतप्रधान मोदी यांनी या लोकसभेत ‘एन्.डी.ए.’ ला ४०० हून अधिक जागा मिळतील, असे सांगितले. त्यावरून विरोधकांची कोल्हेकुई चालू असून देशभरात उलटसुलट चर्चा चालू आहे.  त्याविषयी ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

‘इ.व्ही.एम्.’आणि ‘व्हीव्हीपॅट’ मशीन यांचा इतिहास अन् काम समजून घ्या !

मतदारांचे मौल्यवान मत जपणार्‍या आणि भारतासारख्या सर्वांत मोठ्या लोकशाहीला जी स्थानापन्न करणे आदी महत्त्वाचे कार्य पार पाडणार्‍या या दोन्ही यंत्रांविषयीची माहिती या लेखाद्वारे देत आहोत.

गेल्या निवडणुकीत मतदान केले; मात्र या निवडणुकीत मतदारसूचीत नाव नाही !

निवडणूक आयोगाकडून एकीकडे मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. यासाठी कोट्यवधी रुपये खर्चही केला जात आहेत. असे असले, तरी गेल्या वेळच्या निवडणुकीत  मतदान केलेल्या अनेकांची नावे या निवडणुकीच्या वेळी  मतदारसूचीत नसल्याचे निदर्शनास आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबला

सिंधुदुर्ग मतदारसंघात मुख्य लढत ही महाविकास आघाडीतील ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने’चे उमेदवार तथा विद्यमान खासदार विनायक राऊत आणि महायुतीतील भाजपचे उमेदवार तथा केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यात होणार आहे.

उकाड्यामुळे मतदान केंद्रांवर मतदारांना मिळणार लिंबूपाणी आणि शीतपेय ! – मुख्य निवडणूक अधिकारी

उकाड्यामुळे राज्यातील सर्व १ सहस्र ७२५ मतदान केंद्रांमध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत लिंबूपाणी आणि शीतपेय पुरवले जाणार आहे, तसेच सर्वत्र ‘कूलर’, पिण्यासाठी पाणी, मतदान केंद्राच्या बाहेर सावलीसाठी मंडप आणि मतदारांसाठी वैद्यकीय सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

विभागीय भरारी पथकाद्वारे जिल्ह्यात ८६ सहस्र ३५९ रुपयांचा अवैध साठा जप्त !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाद्वारे जिल्ह्यात गेल्या ४ दिवसांत हवेली तालुक्यात डुडुळगाव, वाघोली, शिंदवणे, उंड्री या परिसरांत धाडी टाकण्यात आल्या.

गोव्यात लोकसभा निवडणूक प्रचार थंडावला !

लोकसभा निवडणूक २०२४ साठीचा गोव्यात गेले एक महिना चालू असलेला प्रचार ५ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता थंडावला. लोकसभेच्या उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही मतदारसंघांसाठी ७ मे या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

मतदारांना भेटण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सर्वसाधारण निरीक्षक भुवनेश प्रताप सिंग यांची नियुक्ती

 ४६- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भारत निवडणूक आयोग, नवी देहली यांच्याकडून नागरिक आणि मतदार यांना भेटण्यासाठी सर्वसाधारण निरीक्षक भुवनेश प्रताप सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी दिली आहे.