बीड येथे चारचाकी वाहनातून १ कोटी रुपयांची रक्कम जप्त !

प्रतिकात्मक चित्र

बीड – ४ मे या दिवशी जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील खामगाव येथील पडताळणी नाक्यावर पडताळणी करत असतांना चारचाकी वाहनात १ कोटी रुपयांची रक्कम सापडली आहे. पोलिसांनी कारचालकाकडे याविषयी विचारपूस केली, तेव्हा त्याने ही रक्कम द्वारकादास मंत्री बँकेची आहे, असे सांगितले. ‘छत्रपती संभाजीनगरमधील द्वारकादास मंत्री बँकेच्या शाखेतून ही रक्कम बीड येथील बँकेच्या मुख्य शाखेत आणली जात आहे’, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. या वेळी ‘या पैशांसमवेत संभाजीनगर येथून पैसे बाळगण्याचे अनुमती पत्र होते,’ असे पोलिसांचे म्हणणे आहे; मात्र १० लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम असल्याने ही रक्कम कोषागार कार्यालयाकडे सुपुर्द केली जाणार आहे. आयकर विभागाचे अधिकारी बँकेच्या शाखेतून ही रक्कम काढली गेली होती कि नाही याची माहिती घेणार आहेत.