‘आपल्याला मराठी भाषेतूनच शिक्षण घेणे आणि बोलणे संकोचाचे वाटू लागले आहे. भारतीय प्रशासकीय सेवा, ‘पीएच्.डी’ (विद्यावाचस्पति), भारतीय परराष्ट्र सेवा या क्षेत्रांत आज १० टक्केही मराठी माणसे नाहीत. हे चित्र पालटायचे, तर माय मराठी मातीची कास धरावी लागेल. शिक्षणपद्धतीत आमूलाग्र पालट करावा लागेल. तळागाळाचा विकास हे मुख्य ध्येय ठरवावे लागेल. शालेय शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे. त्यातून समाजभान, काळाच्या आवश्यकता समजतील आणि आत्मविश्वास वाढेल. इंग्रजीचे ज्ञान आवश्यक आहे. इंग्रजी भाषा चांगली लिहिता-बोलता यायला हवी; पण शालेय शिक्षण मराठीतूनच घ्या.
– श्री. अरुण फिरोदिया, उद्योगपती, पुणे.
संपादकीय भूमिकातळागाळातील जनतेचा विकास करायचा असेल, तर शालेय शिक्षण मातृभाषेतूनच दिले पाहिजे ! |