संतांनी मराठी भाषा सुंदर ठेवली ! – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

संत ज्ञानेश्वरांपासून ते शिवकालीन संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, श्रीसमर्थ रामदासस्वामी, श्रीदासोपंत इत्यादी अगदी श्रीगोंदेकर, शेख महम्मदबाबांसह सगळ्या संतांनी आपली ही मराठी भाषा सुंदर ठेवली आणि साजरीगोजरी बनवली. भजनदिंड्या आणि कीर्तने यांतून मराठी भाषा अधिक फुलली. यापूर्वी अभंग, गवळणी, भारूड-बतावणी आणि ओव्या-उखाणे, जोत्यावरच्या झोपाळ्यावर आणि माजघरातील जात्यावर गायिल्या जात.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘तामसिक इंग्रजीच्या तुलनेत सात्त्विक मराठी भाषा श्रेष्ठ !’)