सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
‘संस्कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या संस्कृतोद्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असण्ो अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत.
३१ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘नामाचे लिंग ठरवण्याच्या पद्धती’, तसेच ‘लिंगांमध्ये पालट केल्यास नामांच्या रूपांत होणारे पालट’ या विषयाच्या संदर्भातील काही सूत्रे जाणून घेतली. आजच्या लेखात त्यापुढील भाग पाहू.
(लेखांक १८ – भाग ३)
मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/668280.html
४ इ. आ-कारांत पुल्लिंगी पदार्थवाचक आणि अन्य निर्जीव गोष्टींचा बोध करून देणार्या नामांची स्त्रीलिंगी रूपे ई-कारांत होणे : ‘हंडा’ हे आ-कारांत पुल्लिंगी नाम आहे. ‘हंडा’ ही एक वस्तू असल्यामुळे त्याला ‘पदार्थवाचक नाम’ असे म्हणतात. ‘पदार्थ’ या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ ‘वस्तू’ असा आहे. ‘हंडा’ या नामाचे स्त्रीलिंगी रूप ‘हंडी’ असे ई-कारांत होते. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
४ ई. काही सजिवांच्या पुल्लिंगी नामांना ‘ईण’ प्रत्यय लागून त्यांची स्त्रीलिंगी रूपे सिद्ध होणे : ‘हत्ती’ हे प्राणीवाचक पुल्लिंगी नाम आहे. त्याचे स्त्रीलिंगी रूप होतांना ‘हत्ती’ या नामाला ‘ईण’ हा प्रत्यय लागतो आणि ‘हत्तीण’ हे रूप सिद्ध होते. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
४ उ. काही पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे पुल्लिंगी नामांपेक्षा पुष्कळ वेगळी असणे : ‘बैल’ हे पुल्लिंगी नाम आहे. त्याचे स्त्रीलिंगी रूप ‘गाय’ हे आहे. ‘बैल’ आणि ‘गाय’ हे शब्द परस्परांपासून पूर्णतः वेगळे आहेत. याचसह आणखी काही पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे नेहमीच्या नियमांहून वेगळ्या पद्धतींनी सिद्ध होतात. याचे एक उदाहरण पाहू. ‘कोकीळ’ हा अ-कारांत पुल्लिंगी शब्द आहे. ‘सजिवांच्या अ-कारांत पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे ई-कारांत होतात’, या नियमानुसार ‘कोकीळ’ या नामाचे स्त्रीलिंगी रूप ‘कोकिळी’ असे ई-कारांत व्हायला हवे; परंतु ते तसे न होता ‘कोकिळा’ असे आ-कारांत होते.
या सूत्राची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
(क्रमशः पुढील शुक्रवारी)
– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.४.२०२३)