कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि भाजप पदाधिकारी यांच्यात खडाजंगी !

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील परिचारकांच्या स्थानांतरणासह मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्याच्या वेळी कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि भाजप पदाधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

मावळा प्रतिष्ठानच्या वतीने १०० गरीब कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप !

ज्यांच्या घराची पडझड झाली आहे आणि शेतीमध्ये भूस्खलन झाले आहे, अशा १०० गरीब कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

मावळा प्रतिष्ठानच्या वतीने १०० गरीब कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप !

प्रतिष्ठानच्या वतीने शाहूवाडी तालुक्यातील चरण, वाडीचरण, पारीवणे, सावर्डे, सावर्डे धनगरवाडा येथील पन्हाळा तालुक्यातील करंजफेण, भुदरगड तालुक्यातील कोनवडे येथील ज्यांच्या घराची पडझड झाली आहे अशांना हे सहाय्य्य करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा !

हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला निवेदन

कोल्हापूर महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या विकासकामांविषयी मंत्रालय स्तरावर बैठक ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा चालू असून त्याला संमती देण्यासाठी शासन सकारात्मक आहे.

इचलकरंजी नगरपालिकेत अंगावर पेट्रोल ओतून कर्मचार्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न !

नगरपालिकेत सेवानिवृत्त कर्मचार्‍याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या वेळी नगरसेवक विठ्ठल चोपडे यांच्यासह चौघांनी तत्परतेने धाव घेत त्याला वाचवले.

आज कर्नाटक शासनाच्या अन्यायकारक भूमिकेच्या निषेधार्थ शिवसैनिक कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी वाहने अडवणार ! – संजय पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना

या वेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने, शिवाजी जाधव उपस्थित होते.

कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्गावरील वाहतूक पूर्ववत्

अतीवृष्टीमुळे पंचगंगा आणि कृष्णा नदी यांना महापूर आला होता. यामुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गावर विविध ठिकाणी रुळाखालील भराव वाहून गेला होता. रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर भराव आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले.

बेळगाव (कर्नाटक) प्रवेशासाठी ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी बंधनकारक !

महाराष्ट्रातून बेळगाव (कर्नाटक) प्रवेशासाठी आता ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. या पूर्वी ज्यांनी कोरोना प्रतिबंधक एक लस घेतली आहे, त्यांना प्रवेश दिला जात होता…..

गेली दोन वर्षे आमच्याकडे कुणीच पाहिले नाही ! – चिखली (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामस्थ

हे ग्रामस्थ पुढे म्हणाले, ‘‘तुम्ही आश्वासन देणार आणि परत जाणार. आदित्य ठाकरेसाहेब आले होते. त्यांनीही पाहिले नाही. आम्ही आमच्या कामाला लागणार, तुम्ही तुमच्या कामाला लागणार. परत कुणी आमच्याकडे बघणार नाही.’’