कोल्हापूर, ४ ऑगस्ट – अतीवृष्टीमुळे पंचगंगा आणि कृष्णा नदी यांना महापूर आला होता. यामुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गावर विविध ठिकाणी रुळाखालील भराव वाहून गेला होता. त्यामुळे २३ जुलैपासून कोल्हापूर येथील रेल्वेस्थानकापासून सर्व रेल्वेसेवा बंद होती. रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर भराव आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि ३ ऑगस्टपासून कोल्हापूर-मिरज मार्गावरील वाहतूक पूर्ववत् झाली आहे.
मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्ग झाला सुरू….युध्द पातळीवर दुरुस्तीचे काम झाले पूर्णhttps://t.co/9FDNeiNi5j pic.twitter.com/CroHglVNkr
— C NEWS (@cnewssangli) August 2, 2021