![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2025/01/29002328/ajay_tmon01_c-1.jpg)
कोल्हापूर – केंद्रीय संचारमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी २७ जानेवारीला श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी श्री महालक्ष्मीदेवीची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे, तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
पंढरपूर
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विठ्ठल-रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले. या वेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते त्यांचा शाल आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.