देशातील कारागृहांमधील ७७ टक्के बंदीवानांवरील खटले प्रलंबित !

आरोपींना अटक करून त्यांच्यावरील खटला प्रलंबित ठेवणे, हा आरोपी आणि फिर्यादी या दोघांवरील अन्याय आहे. ही स्थिती पालटण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक !

सावरकरांचे विचार तळागाळांत पोचवून सकारात्मक पद्धतीने काँग्रेसला विरोध करणार ! – अधिवक्ता दीपक पटवर्धन, भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष

विशेष कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीतील छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रेला प्रारंभ होणार असून जेलनाक्यामार्गे ही यात्रा स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात पोचणार आहे.

कुख्यात गुंड आतिक अहमद याला पोलिसांनी गुजरातमधून प्रयागराजमध्ये आणले !

उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड आतिक अहमद हा गुजरातच्या साबरमती कारागृहात अटकेत होता. त्याला अधिवक्ता उमेश पाल यांच्या हत्येच्या प्रकरणी कह्यात घेऊन उत्तरप्रदेश पोलिसांकडून प्रयागराज येथे आणण्यात आले.

गुजरातमधील १७ कारागृहांवर पोलिसांच्या धाडी

‘कारागृहात बंद असलेल्या गुंडांच्या संशयास्पद हालचालींचा शोध घेणे’, हा या कारवाईचा उद्देश आहे.

खलिस्तानवादी अमृतपाल याच्या ४ साथीदारांना आसामच्या कारागृहात ठेवले !

या चौघांना देशद्रोहाच्या कायद्यांतर्गत जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी आता सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

सलमान खान याला प्रसिद्धीसाठी नाही, तर उद्देशाने मारणार आहोत ! – कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्‍नोई

एक कुख्यात गुंड कारागृहात असतांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वृत्तवाहिनीला थेट मुलाखत देतो, असे केवळ भारतातच घडू शकते !

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात बंदीवानांकडून भ्रमणभाष संच कह्यात !

पहारा आणि अनेक तपासण्या असतांना कारागृहात या वस्तू कशा जातात ? कामचुकारपणा केल्याच्या प्रकरणी अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी !

उत्तरप्रदेशातील राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार आणि पोलीस कर्मचारी यांची हत्या

प्रयागराज येथे वर्ष २००५ च्या राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार उमेश पाल आणि त्याच्या संरक्षणासाठी असलेला पोलीस कर्मचारी यांच्या हत्येच्या प्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी कुख्यात गुंड आतिक अहमद, त्याचा भाऊ अश्रफ, आतिकची पत्नी शाईस्ता आणि त्यांची २ मुले यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

पाकिस्‍तानच्‍या कारागृहात ७०० हून अधिक भारतीय नागरिक

पाकमध्‍ये खितपत पडलेल्‍या भारतियांना परत आणण्‍यासाठी काहीही न करणार्‍या आतापर्यंतच्‍या सर्वपक्षीय सरकारांसाठी हे लज्‍जास्‍पद होय ! आतातरी ही आकडेवारी पुढे आल्‍यावर भारत सरकारने त्‍यांच्‍या सुटकेसाठी कठोर पावले उचलणे आवश्‍यक !

अटकेतील आरोपी आमदार अब्बास अन्सारी याच्यासह कारागृहात मौज करणार्‍या त्यांच्या पत्नीला अटक !

कारागृहात अटकेत असणार्‍याला सर्व प्रकारची अनुमती घेऊन अंतर ठेवून काही मिनिटांसाठी भेटण्याचा नियम असतांना आमदाराची पत्नी थेट त्यांच्या समवेत कशी सापडते, याचे उत्तर जनतेलाही ठाऊक आहे !