गुजरातमधील १७ कारागृहांवर पोलिसांच्या धाडी

गांधीनगर (गुजरात) – गुजरात पोलिसांनी राज्यातील १७ कारागृहांवर २४ मार्चच्या रात्री अचानक धाडी टाकल्या. यात १ सहस्र ७०० पोलिसांचा सहभाग होता.  गृहराज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या पोलीस महासंचालकांसह उच्च अधिकार्‍यांच्या बैठकीनंतर या धाडी घालण्यात आल्या. ‘कारागृहात बंद असलेल्या गुंडांच्या संशयास्पद हालचालींचा शोध घेणे’, हा या कारवाईचा उद्देश आहे.

साबरमती कारागृहत बंदीवान असलेला गुंड अतिक अहमद याने कारागृहातूनच उत्तरप्रदेश येथील अधिवक्ता उमेश पाल यांची हत्या करण्याचा कट रचला आणि हत्या घडवून आणली होती.