कुख्यात गुंड आतिक अहमद याला पोलिसांनी गुजरातमधून प्रयागराजमध्ये आणले !

कुख्यात गुंड आतिक अहमद

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड आतिक अहमद हा गुजरातच्या साबरमती कारागृहात अटकेत होता. त्याला अधिवक्ता उमेश पाल यांच्या हत्येच्या प्रकरणी कह्यात घेऊन उत्तरप्रदेश पोलिसांकडून प्रयागराज येथे आणण्यात आले. पोलिसांच्या वाहनातून जवळपास २० घंट्यांचा प्रवास करून त्याला प्रयागराज येथे आणण्यात आले.

या काळात मध्यप्रदेशातील शिवपूर येथे एका गायीला या गाडीने धडक दिली. यात गायीचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

(सौजन्य : Zee News) 

‘आतिक याला गुजरातमधून उत्तरप्रदेश नेतांना वाटेत त्याला चकमकीत ठार मारण्यात येईल’, अशी भीती त्याच्या बहिणीने व्यक्त केली होती. त्यामुळे ती स्वतः खासगी वाहनातून आतिकला नेण्यात येत असलेल्या पोलिसांच्या ताफ्यासमवेत प्रयागराजपर्यंत आली होती.