श्रीलंकेत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांवर अग्नीसंस्कार करण्यास मुसलमानांचा पुन्हा विरोध !

हिंदु धर्मशास्त्रानुसार मृतदेहावर अग्नीसंस्कार केल्यावर त्यातील सर्व प्रकारचे रोगांचे विषाणू कायमस्वरूपी नष्ट होतात अन् अनिष्ट शक्तींचाही त्रास होत नाही. तसेच अग्नीसंस्कारामुळे जागेचीही बचत होते. याउलट पुरल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात !

‘कर्मचार्‍यांवर आक्रमण होण्याच्या भीतीमुळे फेसबूकची मवाळ भूमिका !’ – अमेरिकेतील दैनिक ‘वॉल स्ट्रीट जर्नल’चा थयथयाट !

हिंदूंच्या संघटनांना ‘हिंसक’ ठरवण्याच्या केलेल्या या प्रयत्नांवरून भारत सरकारने ‘वॉल स्ट्रीट जर्नल’वर कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ! भारतात अशा दैनिकांच्या विक्रीवर आणि संकेस्थळावर बंदी घातली पाहिजे !

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे असणार !

भारताच्या वर्ष २०२१ च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमंत्रित केले होते, अशी माहिती ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी दिली आहे.

भारताच्या शस्त्रसंधी कराराच्या कथित उल्लंघनावरून पाकने भारतीय राजकीय अधिकार्‍यांना जाब विचारला !

भारतीय सैन्याकडून शस्त्रसंधी कराराचे कथितरित्या उल्लंघन केल्यावरून पाकने तेथील भारतीय राजकीय अधिकार्‍यांना जाब विचारला.

(म्हणे) ‘तक्षशिला विश्‍वविद्यालय प्राचीन पाकिस्तानचा भाग !’

खोटेपणाचा कहर ! जर तक्षशिला ‘प्राचीन पाकिस्तान’ असेल, तर पाकने हे मान्य करावे की, त्यांचे पूर्वज हिंदु होते आणि ते बाटलेले मुसलमान आहेत ! त्यांचा इतिहास इतका महान आहे, तर त्यांनी महान हिंदु धर्मांत पुनर्प्रवेश करावा !

हाँगकाँग येथील मोठ्या प्रसारमाध्यम आस्थापनाचे मालक जिमी लाई यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक

चीनकडून लोकशाहीचे समर्थन करणार्‍यांची मुस्कटदाबी चालूच !

न्यूयॉर्कमध्ये चर्चबाहेरील गर्दीवर अंदाधुंद गोळीबार : जीवितहानी नाही !

येथील मॅनहटन भागातील एका चर्चबाहेर आयोजित कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांच्या दिशेने अंदाधूंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात कुणीही घायाळ झाले नाही.

पुढील ४ ते ६ मासांमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होणार ! – बिल गेट्स यांची चेतावणी

इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड एवेल्यूएशनच्या अंदाजानुसार या कालावधीमध्ये कोरोनामुळे २ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू होऊ शकतो. मास्क लावण्यासारख्या इतर नियमांचे पालन केल्यास मृत्यूचा हा आकडा अल्प होऊ शकतो.

बांगलादेशमध्ये मंदिरातील श्री महाकालीमातेच्या ३ मूर्तींची तोडफोड आणि दागिन्यांची लूट !

पाबना (बांगलादेश)च्या शुजानगरमधील अहमदपूरमध्ये असणार्‍या काली मंदिरातील श्री महाकालीमातेच्या ३ मूर्ती अज्ञातांकडून तोडण्यात आल्या आणि दागिने लुटल्याची घटना समोर आली आहे.