इंडोनेशियामध्ये फूटबॉल सामन्यानंतर झालेल्या हिंसाचारात १२९ जणांचा मृत्यू

जकार्ता (इंडोनेशिया) – इंडोनेशियातील कंजुरुहान स्टेडियममध्ये दोन संघांमध्ये झालेल्या फूटबॉलच्या सामन्यानंतर मोठा हिंसाचार झाला. यात १२९ जणांचा मृत्यू झाला, तर १८० हून अधिक जण घायाळ झाले. एका संघाने सामना गमावल्यानंतर हा हिंसाचार झाला. यात सामना पहायला आलेल्या अनेक प्रेक्षकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २ पोलिसांचाही समावेश आहे.

सौजन्य: WION

येथे इंडेनेशियातीलच २ फूटबॉल संघांत हा सामना खेळवण्यात आला होता. एक संघ पराजित झाल्यावर त्याचे चाहते मैदानात घुसले आणि त्यांनी हिंसाचार चालू केला. या वेळी पोलिसांनी तात्काळ दुसर्‍या संघाच्या खेळाडूंचे संरक्षण केले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रथम लाठीमार आणि नंतर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.