डी.एन्.ए. – ‘डीऑक्सीरिबो न्यूक्लिक अॅसिड’ म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक

नवी देहली – काही आठवड्यांपूर्वी माझी अनुवांशिक अनुक्रम चाचणी आणि डी.एन्.ए. चाचणी करण्यात आली. या चाचणीवरून मला कळले की माझा डी.एन्.ए. भारतीय आहे, असे विधान इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी केले. प्रजासत्ताकदिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे प्रबोवो यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या सन्मानार्थ भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मेजवानीचे आयोजन केले होते. या वेळी राष्ट्रपती प्रबोवो बोलत होते.
इंडोनेशियातील नावे प्रत्यक्षात संस्कृत नावे आहेत
राष्ट्रपती प्रबोवो पुढे म्हणाले की, भारतीय संगीत ऐकले की, मी नृत्य करायला प्रारंभ करतो, हे सर्वांना ठाऊक आहे. भारत आणि इंडोनेशिया यांचा मोठा आणि प्राचीन इतिहास आहे. आमचे संस्कृतीचे नाते आहे. आजही आमच्या भाषेचा मोठा भाग संस्कृतमधून येतो. इंडोनेशियातील अनेक नावे प्रत्यक्षात संस्कृत नावे आहेत आणि दैनंदिन जीवनात आमच्यावर असलेल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा प्रभाव पुष्कळ सशक्त आहे. मला वाटते, तेही आपल्या जनुकशास्त्राचा भाग आहे.
संपादकीय भूमिका
|