रशियाच्या विरोधातील प्रस्तावाला भारतासह अनेक देशांचा विरोध

जी-२० शिखर परिषद

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

बाली (इंडोनेशिया) – येथे आयोजित जी-२० शिखर परिषदेत रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धावरून परिषदेच्या समारोपाच्या वेळी रशियावर टीका करण्याचा प्रस्ताव अमेरिका आणि त्याच्या मित्रपक्षांकडून मांडण्यात येणार होता; मात्र त्याला भारत, चीन, ब्राझिल, इंडोनेशिया आणि स्वतः रशिया या देशांनी विरोध केला.

या प्रस्तावाला विरोध करतांना इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी ‘रशियाविरुद्ध अशी निंदनीय आणि कठोर शब्दांचा वापर वापरू नये’, असे आवाहन त्यांनी पाश्‍चात्त्य देशांना केले. रशियाला अनेक मोठ्या देशांकडून सातत्याने पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर अमेरिकेला आता केवळ युरोपीय देशांचा पाठिंबा आहे.

युक्रेनचा प्रश्‍न राजनैतिक मार्गाने सोडवावा ! – पंतप्रधान मोदी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शिखर परिषदेला संबोधित करतांना शांततेचे आवाहन केले. ‘दुसर्‍या महायुद्धानंतर प्रथमच एवढे मोठे संकट आले आहे. सध्या युद्धाची वेळ नाही. युक्रेनचा प्रश्‍न राजनैतिक मार्गाने सोडवावा लागेल’, असे त्यांनी सांगितले.