नवी देहली – फिलिपाईन्सनंतर इस्लामी देश इंडोनेशिया भारताकडून ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या सिद्धतेत आहे. भारत इंडोनेशियाला नौकाविरोधी ब्रह्मोस क्षेपणास्त्राची विक्री करणार आहे. दोन्ही देशांमध्ये लवकरच करार होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या वर्षाच्या शेवटी किंवा पुढील वर्षाच्या प्रारंभी हा करार निश्चित होण्याची शक्यता आहे. भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे ‘ब्रह्मोस’ सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
सौजन्य :India Today
ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे वैशिष्ट काय?
ब्रह्मोस हे अल्प पल्ल्याचे हायस्पीड सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. हे विमान, नौका, भूमी आणि पाणबुड्या यांवरून प्रक्षेपित केले जाऊ शकते. ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वेग आवाजाच्या वेगाच्या तिप्पट आहे.