प्रशासकीय अधिकार्‍यांनी ठरवल्यास ते भ्रष्टाचार थांबवू शकतात ! – महेश झगडे, निवृत्त सनदी अधिकारी

देशाच्या सध्याच्या यंत्रणेतील भ्रष्टाचाराची निर्मिती ही राजकीयपेक्षा प्रशासकीय यंत्रणेतूनच होत असून या यंत्रणेवर प्रभावी अंकुश ठेवण्यात सर्वच घटकांना अपयश येत आहे.

कंत्राटी युनानी वैद्यकीय अधिकार्‍यांना शासकीय नोकरीत समाविष्ट करणार ! – डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

कंत्राटी पद्धतीने कार्यरत वैद्यकीय अधिकार्‍यांना शासकीय नोकरीत समाविष्ट करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणी मुख्य सचिवांना लक्ष घालण्यास सांगणार !

श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे प्रकरण बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही चौकशी बंद करणे, हा न्यायालय आणि विधीमंडळ यांचा अवमान आहे.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करा !

संबंधित महिलेची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा आणि योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्हाला महाराष्ट्रभर वैध मार्गाने आंदोलन करावे लागेल.

फलटण (जिल्हा सातारा) येथील कृषी साहाय्यकास लाच स्वीकारतांना अटक !

लाचखोरांवर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत इतरांवर जरब बसणार नाही !

उत्तरप्रदेशात पोलीस अधिकार्‍याला बंदुकीत गोळी कुठून घालायची, हेच ठाऊक नाही !

असे अधिकारी पोलीसदलात भरती कसे झाले ? ‘अशांना प्रशिक्षण देतांना ते काय करत होते ?’, याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे ! असे पोलीस जनतेचे रक्षण कधीतरी करू शकतील का ?

भविष्यात शेतीच्या हानीचे भ्रमणभाषद्वारे ‘ई पंचनामे’ करणार ! – शंभूराज देसाई, मंत्री, महाराष्ट्र

शेतकर्‍यांना पीकहानी भरपाई तातडीने मिळावी, पंचनामे लवकरात लवकर व्हावे, यासाठी भ्रमणभाषद्वारे ‘ई-पंचनामे’ करण्याचे ‘ॲप’ विकसित करण्याचे काम चालू आहे.

तुर्भे येथे बंदी असलेल्या थर्मोकोलची साठवणूक करणार्‍यावर कारवाई, ५ टेम्पो थर्मोकोल जप्त

या कारवाईत संबंधित दुकानदाराला १० सहस्र रुपये दंड आकारण्यात आला. नवी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकार्‍यांना तुर्भे येथे लक्ष्मी इंटरप्राईजेस या दुकानात मोठ्या प्रमाणात थर्माकोलचा साठा असल्याची माहिती मिळाली होती.

कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश करा ! – उद्धव ठाकरे

सीमावादाच्या सूत्राविषयी सर्वोच्च न्यायालयाचा जोपर्यंत निकाल येत नाही, तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा. सर्व पक्षांनी मराठी बांधवांच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

मुक्ताईनगर (जळगाव) येथील गौण खनिज उत्खनानात ४०० कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप

एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याची सार्वजनिकरित्या वाच्यता केली होती मात्र मुरुम उत्खननाच्या प्रकरणात एकनाथ खडसे हेच अडचणीत येण्याची शक्यता आहे.