उत्तरप्रदेशात पोलीस अधिकार्‍याला बंदुकीत गोळी कुठून घालायची, हेच ठाऊक नाही !

पोलीस महासंचालकांनी पोलीस ठाण्यात जाऊन केलेल्या निरीक्षणात उघड !

पोलीस

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे पोलीस महासंचालक आर्.के. भारद्वाज यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांकडून शस्त्रे चालवण्याचे प्रात्यक्षिक करून घेतले. या वेळी एका पोलीस निरीक्षकाला बंदुकीमध्ये गोळी कुठून घालायची, हेच ठाऊक नसल्याचे आणि त्याने बंदुकीच्या नळीतून गोळी आत टाकून गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. पोलीस अधिकार्‍यांची ही स्थिती पहाता पोलीस महासंचालक भारद्वाज यांनी सर्व अधिकार्‍यांना योग्य प्रशिक्षण देण्याचा आदेश दिला.

संपादकीय भूमिका

  • असे अधिकारी पोलीसदलात भरती कसे झाले ? ‘अशांना प्रशिक्षण देतांना ते काय करत होते ?’, याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे ! असे पोलीस जनतेचे रक्षण कधीतरी करू शकतील का ?