आदिवासी तरुणींशी बलपूर्वक विवाह करून घुसखोर त्यांच्या भूमी कह्यात घेत आहेत ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

आदिवासींची नोकरी आणि मुलांना शिक्षण देण्याच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. सोरेन सरकारने कल्याणकारी योजनांच्या नावाखाली जनतेला धोका दिला आहे, असा आरोप शहा यांनी केला.

(म्‍हणे) ‘लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांचे नाव अन् छायाचित्र माध्‍यमांमध्‍ये देऊ नका !’ – अधिकारी महासंघाची मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी

अधिकारी महासंघाने अशी मागणी करून लाचखोरांची पाठराखण करण्‍यापेक्षा ‘प्रामाणिकपणे कामे करून स्‍वतःतील भ्रष्‍टाचारी वृत्ती नष्‍ट करण्‍यासाठी प्रयत्न करावेत’ !

प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपजिल्हाधिकारी आणि पोलीस यांची दायित्व एकमेकांवर ढकलण्याची वृत्ती लज्जास्पद ! – उच्च न्यायालय

‘सनबर्न’ महोत्सवात ध्वनीप्रदूषण होऊनही ते रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपजिल्हाधिकारी किंवा पोलीस यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत – उच्च न्यायालय

सणांच्या काळात अतिरिक्त दर आकारून प्रवाशांना लुटणार्‍या ‘बस ऑपरेटर्स’वर नियंत्रण ठेवा !

अशी मागणी का करावी लागते ? प्रवाशांची लूट होते, हे वाहतूक खात्याच्या लक्षात का येत नाही ?

म्हादई जलवाटप तंटा

म्हादई नदीचे पाणी कळसा आणि भंडुरा येथे उभारण्यात येणार्‍या धरणांच्या माध्यमातून मलप्रभा नदीत वळवण्यासाठी केंद्रीय जल आयोगाने कर्नाटक सरकारला संमती दिल्याने गोव्यात तीव्र असंतोष उमटला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार यांना ‘धर्मवीर’ कधीच कळणार नाहीत ! – नितेश राणे, आमदार, भाजप

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र द्यावे, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीटद्वारे केली आहे.

(म्हणे) ‘धार्मिक कार्यक्रम करण्यास लादलेली बंदी हटवा, अन्यथा उपोषण करणार !’ – ‘बिलिव्हर्स’चे पास्टर डॉम्निक यांच्या समर्थकांची चेतावणी

प्रशासनाने ‘बिलिव्हर्स’च्या धमक्यांना भीक न घालता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर रहावे ! हिंदू सहिष्णू असल्याने अनेक हिंदूंचे आमिषे दाखवून आणि फसवणूक करून धर्मांतर झाले, तरी हिंदूंनी वैध मार्गाने धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवला !

पोलीसदलात ‘सीमा’ हव्यात !

बेपत्ता मुलांची समस्या ! केवळ पोलिसांवर दायित्व ढकलून चालणार नाही. त्यासाठी ‘गरिबी निर्मूलन करणे’, ‘मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे’, ‘मुलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांवर आळा घालणे’, यांसाठी शासन आणि समाजाकडूनही  प्रयत्न व्हायला हवेत. सीमा ढाका यांच्या कामगिरीची नोंद घेतांना या सर्व सूत्रांचा सर्वांगाने अभ्यास होणे आवश्यक !

रत्नागिरीत आंबा बागायतदारांनी केलेल्या आंदोलनात शासनाला दिली चेतावणी

कोरोनाचे संकट, चक्रीवादळे अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये अडकलेले बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात आहेत.

बेंजामिन नेतन्याहू इस्रायलचे सहाव्यांदा पंतप्रधान

इस्रायलच्या संसदेत १२० सदस्य आहेत. नेतन्याहू यांच्या आघाडीकडे ६३ खासदारांचे संख्याबळ आहे. नेतन्याहू यांना सरकार चालवतांना मोठी कसरत करावी लागणार आहे.