अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत राज्यात नवीन धोरण घोषित करणार ! – राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री

राज्यात नदी, वाळू, खाणी यांतील वाळूचे अवैध उत्खनन चालू आहे. याला आळा घालण्यासाठी नवीन धोरणामध्ये सामान्य नागरिकांनाही वाळू उत्खननाचा परमिट परवाना सरकारकडून मिळेल.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्पर्श रुग्णालयात अपव्यवहार !

स्पर्श रुग्णालय आणि प्राथमिकदृष्ट्या दोषी असलेले संबंधित अधिकारी यांची चौकशी चालू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांनी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देतांना दिली.

पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त करणार ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

हिंदु समाज हा एकसंध राहिला पाहिजे. मंदिराचे सरकारीकरण आणि बळजोरीने होऊ घातलेला ‘कॉरिडॉर’ दोन्ही गोष्टी अन्यायकारक आहेत.

लव्ह जिहाद रोखण्यासाठी विशेष पोलीस पथकाची स्थापना करा ! – कर्नाटकात हिंदूंची एकमुखी मागणी

गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले, लव्ह जिहादविषयी जी कारवाई करणे अपेक्षित आहे, ती मी पूर्ण दायित्व घेऊन करीन. यासह हलाल प्रमाणपत्राच्या संदर्भात अन्वेषण करून या संदर्भातही आवश्यक ती कृती करीन.

आदिवासी समाजाच्या जागांची भरती डिसेंबर २०२३ पर्यंत करू ! – दीपक केसरकर

वर्ष २०१९ मध्ये भरतीचा निर्णय घेण्यात आला; मात्र ही भरती झाली नव्हती. आताचे सरकार भरतीप्रक्रिया कालबद्धतेत पूर्ण करेल, असे आश्वासन या वेळी दीपक केसरकर यांनी दिले. 

अनुसूचित जमाती प्रवर्गाची भरती प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने राबवणार !- दीपक केसरकर, प्रभारी समाजकल्याण मंत्री

अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या आधारे शासकीय सेवेत भरती झालेल्या आणि त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या उमेदवारांना अधिसंख्य पदावर कायम ठेवले आहे.

‘पठाण’ चित्रपट आणि त्याचे प्रदर्शन यांवर बंदी घाला !

समस्त हिंदुत्ववादी संघटनांची तळोदा (जिल्हा नंदुरबार) येथील तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी !

फोन टॅपिंगप्रकरणात विरोधकांचा विधानसभेतून सभात्याग !

फोन टॅपिंग प्रकरणात अर्ध्या घंट्यांच्या चर्चेसाठी नियमानुसार १ घंटा आधी निवेदन दिले नसल्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चर्चा नाकारली. यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.

अर्धा इंच जागाही कर्नाटकला देणार नाही !

सरकार सीमाभागातील ३६५ गावांतील मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. बोम्मई यांच्या उद्दाम वागण्यामुळे मराठी माणसाचे रक्त सळसळले आहे.

राज्यात लवकरच मेडिकल बोर्डच्या माध्यमातून ४ सहस्र ५०० जागा भरणार ! – गिरीश महाजन, आरोग्यमंत्री

भरतीमध्ये आधुनिक वैद्यांची ३०० पदे भरली जाणार आहेत. ‘एम्.पी.एस्.सी.’मधून पदभरतीस वेळ लागतो. त्यामुळे ही भरती करण्यासाठी सरकार ‘मेडिकल बोर्ड’ सिद्ध करणार आहे.