तुर्भे येथे बंदी असलेल्या थर्मोकोलची साठवणूक करणार्‍यावर कारवाई, ५ टेम्पो थर्मोकोल जप्त

(प्रतिकात्मक चित्र)

नवी मुंबई, २६ डिसेंबर (वार्ता.) – तुर्भे येथे बंदी असलेल्या थर्मोकोलची साठवणूक करणार्‍यांवर घनकचरा विभागाकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५ टेम्पो थर्मोकोल जप्त करण्यात आले. तसेच संबंधित दुकानदाराला १० सहस्र रुपये दंड आकारण्यात आला. नवी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकार्‍यांना तुर्भे येथे लक्ष्मी इंटरप्राईजेस या दुकानात मोठ्या प्रमाणात थर्माकोलचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बाबासाहेब राजळे यांनी दुकानावर धाड घालून कारवाई केली.

मागील आठवड्यात माथाडी भवन परिसरात एका गोडाऊनवर धाड टाकून ३५० किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या होत्या, असे वडजे यांनी सांगितले.