फलटण (जिल्हा सातारा) येथील कृषी साहाय्यकास लाच स्वीकारतांना अटक !

सातारा – मृत पत्नीचे ‘शेतकरी अपघात विमा योजना’ प्रकरण वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून कृषी साहाय्यक बाळू निवृत्ती गाढवे यांनी १० सहस्र रुपयांची लाच मागितली. ही लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गाढवे यांना अटक केली.

तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीनुसार ‘शेतकरी अपघात विमा योजना प्रकरण’ सिद्ध करून पाठवण्यासाठी फलटण तालुका कृषी अधीक्षक कार्यालयातील कृषी साहाय्यक गाढवे यांनी लाच मागितली. या प्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. घटनेची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यामध्ये कृषी साहाय्यक गाढवे यांना लाच स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले.

संपादकीय भूमिका

लाचखोरांवर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत इतरांवर जरब बसणार नाही !