नागपूर, २७ डिसेंबर (वार्ता.) – शेतकर्यांना पीकहानी भरपाई तातडीने मिळावी, यासाठी पंचनामे तातडीने होणे आवश्यक आहे. पंचनामे लवकरात लवकर व्हावे, यासाठी भ्रमणभाषद्वारे ‘ई-पंचनामे’ करण्याचे ‘ॲप’ विकसित करण्याचे काम चालू आहे. भविष्यात शेतीच्या हानीचे भ्रमणभाषद्वारे ‘ई-पंचनामे’ करण्यात येतील, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी २७ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली. आमदार दीपक चव्हाण यांनी पावसामुळे हानी झालेल्या पिकांना हानी भरपाई मिळावी, यासाठी सभागृहात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर मंत्री देसाई यांनी उत्तर दिले.