|
हाथरस (उत्तरप्रदेश) – येथे एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. यांतर्गत उत्तरप्रदेश सरकारच्या सामूदायिक विवाह योजनेचा अपलाभ उठवण्यात आला. अनेक विवाहित जोडप्यांनी पैशांच्या हव्यासापोटी पुनर्विवाह केला. यात एका भावाने बहिणीशी विवाह केल्याचा नीतीहीन प्रकारही समोर आला आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी होती. काही ग्रामस्थांनी तक्रार केल्यावर या घटनेने लक्ष वेधले. यानंतर स्थानिक उपजिल्हाधिकार्यांनी कारवाई केली आणि या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.
१. राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री सामुहिक विवाह योजने’च्या अंतर्गत वधूच्या बँकेत ३५ सहस्र रुपये, जोडप्यासाठी १० सहस्र रुपये मूल्याच्या जीवनावश्यक वस्तू आणि सोहळ्यासाठी ६ सहस्र रुपये खर्च देण्यात येतो.
२. विशेष म्हणजे एका सरकारी कर्मचार्याने या योजनेचा आर्थिक लाभ घेण्यासाठी फसव्या विवाहांची योजना आखली.
३. १५ डिसेंबर २०२३ या दिवशी हाथरस येथे सामूहिक विवाह कार्यक्रम झाला होता. यात २१७ जोडप्यांचा विवाह लावून देण्यात आला होता.
संपादकीय भूमिकाअशा घटनांतून केवळ विकास करून उपयोग नाही, तर त्या विकासाला पात्र असणार्या समाजाची निर्मितीही होणे आवश्यक आहे, हेच दिसून येते. यासाठी जनतेला धर्मशिक्षण देऊन साधना करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. |