आदिवासी तरुणींशी बलपूर्वक विवाह करून घुसखोर त्यांच्या भूमी कह्यात घेत आहेत ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

अमित शहा

पश्‍चिम सिंहभूम (झारखंड) – देशात घुसखोरी करणारे आदिवासी तरुणींशी बलपूर्वक विवाह करून त्यांच्या भूमी कह्यात घेत आहेत. मी आज हेमंत सोरेन सरकारला चेतावणी देतो की, घुसखोरांच्या या दुःसाहसाला रोखावे, नाहीतर झारखंडची जनता तुम्हाला क्षमा करणार नाही. मतपेढीची लालसा आदिवासींच्या कल्याणापेक्षा अधिक मोठी असू शकत नाही, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे एका सभेत केले.

अमित शहा पुढे म्हणाले की, राज्यातील आदिवासींची नोकरी आणि मुलांना शिक्षण देण्याच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. सोरेन सरकारने कल्याणकारी योजनांच्या नावाखाली जनतेला धोका दिला आहे, असा आरोप शहा यांनी केला.