शस्त्रक्रियांचे स्वयंघोषित ठेकेदार !

ही वेळ पॅथींमध्ये स्पर्धा लावून ‘कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ ?’ ही ठरवण्याची नाही. खेडोपाडी रुग्णसेवा बजावण्यास केव्हाही सिद्ध असणारे वैद्य निर्माण करण्याची ही वेळ आहे. यासाठी वैद्यकीय संघटनांनी स्वतःची ऊर्जा खर्ची घातली, तर समाजाचे भले होईल !

देशभरात एका मासामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत ६३ टक्क्यांची वाढ !

गेल्या २४ घंट्यांत कोरोनामुले १३१ लोकांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या घटनांत महाराष्ट्र पुढे आहे.

पुणे येथील कोविड रुग्णालयातील रुग्णांना निकृष्ट जेवण मिळत असल्याची रुग्णांची तक्रार

भोसरी येथील महानगरपालिकेच्या नवीन कोविड रुग्णालयातील बाधित रुग्णांनी जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार केली आहे.

कुंभमेळ्यात रुग्ण सेवेसाठी ५४ रुग्णवाहिका उपलब्ध

कुंभमेळ्यात पवित्र (शाही) स्नानाच्या दिवशी आपत्कालीन सेवेत २ एम्.आय. रुग्णवाहिका, ५४ चारचाकी आणि ४० दुचाकी रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे मेळाअधिकारी डॉ. अर्जुनसिंह सेंगर यांनी दिली.

मराठी भवन मरीन ड्राईव्ह (मुंबई) येथे उभारणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

मरीन ड्राईव्ह येथील जवाहरलाल बालभवन येथे मराठी भवन उभारण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिली.

सिंधुदुर्गात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी

कोरोनाचा संसर्ग नव्याने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात ‘कोविड-१९’च्या चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यावरही भर देण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ९ मार्चला आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दिल्या.

शेतकर्‍यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज आणि महिलांसाठी ‘राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना’

अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत महाविकास आघाडी शासनाचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प १० सहस्र २२६ कोटी रुपये तुटीचा आहे.

मोर्ले येथे हत्तीच्या आक्रमणात युवक गंभीर घायाळ

मोर्ले येथील शेतकरी विश्‍वनाथ सुतार काजूच्या बागेत गेले होते. तेव्हा अचानक आलेल्या हत्तीने सुतार यांच्यावर आक्रमण करत त्यांना उचलून आपटले. यामध्ये सुतार गंभीर घायाळ झाले.

कोरोनासह इतर विषाणूंपासून रक्षण होण्यासाठी देशातील पहिल्या ‘विषाणू रक्षक’ आयसोलेशन चेंबर्सची निर्मिती

फ्रान्स, जर्मनी या देशांत अशा प्रकारच्या चेंबर्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्याचे मूल्य या देशात अनुमाने १८ लाख रुपयांपर्यंत आहे. आपल्या आधुनिक वैद्यांनी हा विषाणू रक्षक चेंबर ३ लाख रुपयांमध्ये सिद्ध केला आहे.

कोरोनाच्या चाचण्या वाढवणे, रुग्णांचा शोध घेणे आणि लसीकरण करणे यांवर भर द्या !

कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्य खात्याने गोव्यासह एकूण ७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना कोरोनाच्या चाचण्या वाढवणे, रुग्णांचा शोध घेणे आणि लसीकरण करणे यांवर भर देण्याचा आदेश दिला आहे.