पचायला जड आणि हलके पदार्थ कसे ओळखावेत ?
‘जे पदार्थ खाल्ल्यावर सुस्ती येते किंवा शरिरात जडपणा जाणवतो, ते पदार्थ पचायला जड असतात. सर्व प्रकारची पक्वान्ने, गोडधोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, दुधापासून बनवलेले पदार्थ (तूप आणि ताक सोडून), कच्चे (न शिजवलेले) पदार्थ (उदा. कच्च्या भाज्या, भिजवलेली किंवा मोड आणलेली कडधान्ये), ही जड पदार्थांची काही उदाहरणे आहेत.