कोल्‍हापूर येथे ‘रग्‍गेडियन जिम’च्‍या वतीेने रक्‍तदान शिबिर !

रक्‍तदान शिबिरात सहभागी नागरिक

कोल्‍हापूर – ‘रग्‍गेडियन जिम’ येथे २५ जूनला विनामूल्‍य आरोग्‍य पडताळणी आणि रक्‍तदान शिबिर पार पडले. आरोग्‍य शिबिराचा लाभ ५०० जणांनी घेतला, तर रक्‍तदान शिबिरात ८० लोकांनी रक्‍तदान केले.

सध्‍या कोल्‍हापूर जिल्‍ह्यात रक्‍ताचा तुटवडा असल्‍याने ‘रग्‍गेडियन’च्‍या वतीने त्‍यांचे सदस्‍य, मित्रपरिवारास रक्‍तदान करण्‍याचे आवाहन केले होते. याचे उद़्‍घाटन ‘लोकमत’ समूहाचे उपसंपादक मकरंद देशमुख यांच्‍या हस्‍ते झाले.  या वेळी अमोल कोरगावकर, आकाश कोरगावकर, डॉ. पार्थ भिंगार्डे, डॉ. दुर्गा भिंगार्डे, ‘अर्पण ब्‍लड बँक’चे डॉ. गाडवे यांसह अन्‍य उपस्‍थित होते.

‘रग्‍गेडियन’च्‍या वतीने दंतचिकित्‍सा, आहार, केस आणि त्‍वचा, होमिओपॅथी, आयुर्वेद, नेत्र यांसह अन्‍य विभागांच्‍या तज्ञ डॉक्‍टरांकडून पडताळणी करण्‍यात आली. ‘रग्‍गेडियन फिटनेस’ ही व्‍यायामशाळा कोल्‍हापुरातील अत्‍याधुनिक आणि पूर्णतः वातानुकूलित व्‍यायामशाळा आहे. ‘रग्‍गेडियन’ नेहमीच आरोग्‍य आणि खेळ संस्‍कृतीला चालना देण्‍यासाठी बर्‍याच वर्षांपासून कार्य करीत आहे. आरोग्‍य शिबिराच्‍या माध्‍यमातूनही काम चालू आहे.