निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २०८
आंबे आणि फणस ही फळे पचायला जड असतात. पावसाळ्यामध्ये शारीरिक श्रम न करता केवळ बैठी कामे करणार्यांना ही फळे खाल्ल्याने भूक मंदावणे, अपचन होणे, अंग जड होणे, ताप येणे, जुलाब होणे यांसारखे त्रास होऊ शकतात. यामुळे पावसाळ्यात ही फळे खाऊ नयेत. खायचीच झाल्यास थोड्या प्रमाणात खावीत आणि ही फळे खाऊन चांगली भूक लागेपर्यंत पुढचा आहार घेऊ नये.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.६.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan