बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने दोघांचा मृत्यू !

बिहारमध्ये दारूबंदी असतांना तथे सहजतेने दारू मिळते. याचाच अर्थ तेथील पोलीस आणि प्रशासन किती भ्रष्ट आहेत, हे स्पष्ट होते !

कोरोना महामारीत केलेल्या साहाय्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपिठावरून अनेक देशांनी मानले भारताचे आभार !

हे वृत्त म्हणजे भारतावर आगपाखड करणार्‍या देशांच्या आणि जागतिक नेत्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजनच होय !

महाराष्ट्रात वर्ष २०२२-२३ मध्ये १३ सहस्र ६५३ नवजात बालकांचा मृत्यू !

प्रत्येक दिवसाला ३१ बालकांचा, तर प्रत्येक ३९ व्या मिनिटाला एका नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे.

सांगलीत श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशीच महापालिकेकडून शेरीनाल्याचे सांडपाणी कृष्णा नदीत !

संस्थांच्या मूर्तींसह घरगुती श्री गणेशमूर्तींचे पाचव्या दिवशी कृष्णा नदीत विसर्जन होते, हे ठाऊक असतांना महापालिकेच्या सांडपाणी विभागाने शेरीनाल्यातील सांडपाणी आणि ड्रेनेजचे पाणी कोरड्या पडलेल्या कृष्णा नदीत सोडून दिल्याने सांगलीकरांकडून संताप व्यक्त होत आहे.

भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना आता परदेशात करता येणार रुग्णांवर उपचार !

जागतिक वैद्यकीय शिक्षण महासंघाने भारताच्या ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ला १० वर्षांसाठी मान्यता दिली आहे. यामध्ये भारतातील ७०६ वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

कोळीकोड (केरळ) येथे निपाह विषाणुच्या संसर्गाच्या धोक्यामुळे २४ सप्टेंबरपर्यंत शैक्षणिक संस्था बंद

कोळीकोड निपाह विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने २४ सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालय आणि शिकवणी वर्ग बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आला. येथे निपाह विषाणुचे ६ रुग्ण आढळले आहेत, तर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या १ सहस्र ८ इतकी झाली आहे.

मुलांना उपाहारागृहातून मागवलेल्या जेवणापेक्षा घरी बनवलेले जेवण द्या ! – केरळ उच्च न्यायालय

मैदानात खेळून घरी आल्यानंतर मुलांना आईने बनवलेल्या भोजनाचा सुगंध घेता येऊ दे. आम्ही याविषयीचा निर्णय मुलांच्या माता-पित्यांवर सोपवतो.

भारताने अफगाणिनस्तानमध्ये पाठवले ५० सहस्र मेट्रिक टन धान्य आणि २०० टन औषधे !

भारत एक हिंदूबहुल देश आहे आणि तो मुसलमानबहुल अफगाणिस्तानला साहाय्य करत आहे; मात्र या देशात किती हिंदू शिल्लक आहेत ?

नंदुरबारमधील कुपोषण आणि बालमृत्‍यू यांना राज्‍य सरकार उत्तरदायी ! – आमदार आमश्‍या पाडवी

स्‍वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्‍या सर्व शासनकर्त्‍यांना हा प्रश्‍न सोडवता न येणे लज्‍जास्‍पद आहे. सरकारने आता तरी ही समस्‍या संपवावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.

स्‍वतःच्‍या मनाने दीर्घ काळ औषधे घेणे टाळावे  !

‘अनेक जण मधुमेह बरा व्‍हावा, यासाठी स्‍वतःच्‍या मनाने कारले, जांभूळ बी इत्‍यादींचे चूर्ण नियमितपणे घेत असतात.