भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना आता परदेशात करता येणार रुग्णांवर उपचार !

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला जागतिक महासंघाने दिली १० वर्षांची मान्यता !

नवी देहली – जागतिक वैद्यकीय शिक्षण महासंघाने भारताच्या ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ला १० वर्षांसाठी मान्यता दिली आहे. यामध्ये भारतातील ७०६ वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. यामुळे आता भारतीय विद्यार्थी  अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांसारख्या देशांतील रुग्णांवर पुढील १० वर्षे उपचार करू शकतील. आतापर्यंत एम्.बी.बी.एस्.चे शिक्षण घेणारे विद्यार्थी केवळ भारतातच वैद्यकीय उपचार करू शकत होते.

भारतीय विद्यार्थी परदेशी वैद्यकीय शिक्षण आणि युनायटेड स्टेट्स वैद्यकीय परवाना परीक्षेसाठीही अर्ज करू शकतात. तसेच परदेशी विद्यार्थ्यांनाही भारतात येऊन एम्.बी.बी.एस्.चा अभ्यास करता येणार आहे. येथून शिक्षण घेतल्यानंतर त्यांना विविध देशांमध्ये जाऊन रुग्णांवर उपचार करता येईल.