१० जणांवर गुन्हा नोंद
सोलापूर – येथे सतनाम चौकातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी निवडीची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीनंतर काही कार्यकर्ते चहा पिण्यासाठी शास्त्रीनगर परिसरात आले असता तेथे त्यांनी घोषणा दिल्या. त्यामुळे दुसर्या एका गटानेही घोषणाबाजी केली. त्यानंतर दोन्ही गट समोरासमोर येऊन दगडफेक झाली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. दगडफेकीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दगडफेकीमध्ये काही युवक घायाळ झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी १० आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करत अटक केली आहे.
Solapur Stone Pelting : सोलापुरात दोन गटात वाद, वादाचे पर्यावसन दगडफेकीत; 10 जणांना अटक https://t.co/AlCr3JlyYa @journalistaftab#Solapur #StonePelting
— ABP माझा (@abpmajhatv) August 17, 2023
या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. परिसरात अजूनही पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. संतोष वसंत मरेड्डी, गणेश भारत रोकडे, पंकज संजय कोल्लूर, योगीराज राजू म्हेत्रे, अरबाज शब्बीर बेपारी, दुर्गादास विजय म्हेत्रे, सागर दीपक कोरे, प्रशांत हिरालाल सोंडेकर, प्रथमेश संजय कोल्लूर, महेश रमेश कोरे, अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.