मुंबईमध्‍ये विसर्जनासाठी ३०८ कृत्रिम तलाव उभारणार !

‘कृत्रिम तलाव’ ही धर्मविरोधी संकल्‍पना असल्‍याने तिचा अवलंब करण्‍यापेक्षा वहात्‍या पाण्‍यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे आणि धर्माचरण करावे !

गणेशभक्तांच्या परतीसाठी रत्नागिरी विभागातून १ सहस्र ५५० जादा गाड्यांचे नियोजन : २७९ गाड्यांचे आरक्षण पूर्ण

गणेशोत्सवासाठी आलेल्या गणेशभक्तांना परत जाण्यासाठी रत्नागिरी विभागातून १ सहस्र ५५० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून २७९ गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाचे विभागप्रमुख प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.

श्री गणेशमूर्तीचे विडंबन नकोच !

सप्‍टेंबरमध्‍ये गणेशोत्‍सव चालू होणार…! त्‍याची लगबग काही मास आधीच चालू होते. ठिकठिकाणी सिद्ध केल्‍या जाणार्‍या श्री गणेशमूर्ती गणेशभक्‍त आपापल्‍या घरी किंवा जेथे गणेशोत्‍सव साजरा केला जातो, त्‍या ठिकाणी घेऊन जातात.

गोव्यात बंदी असूनही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध ! – पारंपरिक मूर्तीकाराचा आरोप

बंदी आदेश केवळ कागदोपत्री काढून काय उपयोग ? प्रशासन कार्यवाही का करत नाही ?

गोवा : यंदाही अनुदानात वाढ न झाल्यामुळे शाडू मातीपासून श्री गणेशमूर्ती बनवणारे मूर्तीकार अप्रसन्न !

स्थानिक हस्तकला जोपासण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात, मग श्री गणेशमूर्ती बनवण्यासाठी अनुदानात वाढ करण्यास कोणती अडचण ?

फिरते हौद बंद करून मूर्तीदान केंद्राची संख्‍या वाढवण्‍याचा पुणे महापालिकेचा धर्मद्रोही निर्णय !

फिरते हौद, मूर्ती संकलन केंद्र, दान केंद्र यांसारख्‍या अशास्‍त्रीय गोष्‍टींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्‍यापेक्षा पालिकेने भक्‍तांना वहात्‍या पाण्‍यात मूर्ती विसर्जनास प्रोत्‍साहन दिल्‍यास श्री गणेशाची कृपा होईल !

श्री गणेश मूर्तीकारांनी मातीच्या मूर्ती निर्मितीस प्राधान्य द्यावे ! – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, सातारा

या वर्षी १९ सप्टेंबर या दिवशीपासून गणेशोत्सव चालू होत आहे. मूर्तीकारांची मूर्ती बनवण्याची लगबग चालू झाली आहे. गणेशोत्सवासाठी केंद्र सरकारने वर्ष २०२० मध्ये काही सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीची मूर्ती बनवली पाहिजे, अशी सूचना आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या एका मार्गिकेचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करू ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

मुंबई-गोवा महामार्गाची सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी पहाणी केली. गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण केले जाईल, तर डिसेंबरपर्यंत दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामाला वेग

मुंबई – गोवा महामार्गाची पहाणी करत असतांना कशेडी घाटातील दोनपैकी १ बोगदा कोणत्याही परिस्थितीत गणेशभक्तांसाठी गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या.

मूर्तीकारांना नि:शुल्क जागा आणि घरगुती स्तरावर शाडूच्या मूर्तीचे बंधन !

मूर्ती शाडूची मातीची असल्यास त्यातून प्रदूषणही होत नाही. त्यामुळे प्रशासनाने उत्सव धर्मशास्त्रानुसार साजरे करण्याची भूमिका घ्यावी !