मुंबई महानगरपालिकेने वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या ९९ मंडळांची अनुमती नाकारली !

सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या अर्जाचे प्रकरण

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांना मंडपाच्‍या अनुमतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा मुंबई महापालिकेकडून यंदा १ ऑगस्‍टपासून उपलब्‍ध करण्‍यात आली आहे. रस्‍त्‍यांवर मंडप उभारणी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या ९९ सार्वजनिक मंडळांना मुंबई महापालिकेने अनुमती नाकारली आहे. अनुमतीसाठी यापैकी काहींनी वारंवार अर्ज केल्‍याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. त्‍यांनी ठिकाण पालटल्‍यास त्‍यांना अनुमती देण्‍यात येणार असल्‍याचे समजते.