पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला

श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या प्रतिकात्मक मूर्ती सभामंडपात आणण्यात आल्या. त्यानंतर मंत्रोच्चार आणि मंगलाष्टक यांच्या गजरात उपस्थितांनी अक्षता वाहिल्या.

पणजी येथील कार्निव्हलमध्ये सामाजिक अंतर पाळणे आणि मास्क घालणे या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन !

पोलिसांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केलेल्यावर नियमांचे पालन होण्यासाठी कोणतीच कृती केली नाही.

माघी गणेशोत्सवासाठी नियमावली घोषित !

माघी गणेशोत्सवामध्ये राज्य सरकारने ज्यांना शक्य असेल त्यांनी घरीच श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, असे नियमावलीत स्पष्ट केले आहे. सरकारने माघी गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना घोषित केल्या आहेत. त्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळून उत्सव साजरा करावा, असे आदेश सरकारने दिले आहेत.

कोटीशः प्रणाम !

• कोनाळ, दोडामार्ग येथील श्री सातेरी भूतनाथ पंचायतनाचा आज वार्षिक जत्रोत्सव !
• गोवा येथील सनातनच्या २१ व्या संत पू. (श्रीमती) सीताबाई मराठे यांची आज पुण्यतिथी

माघ वारी होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वारकर्‍यांनी घेतली भेट

कोरोनाचा प्रादुर्भाव न्यून झाल्याने अनेक सार्वजनिक उपक्रम चालू झाले आहेत. मंदिरेही दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत, तसेच लसीकरणाची मोहीमही चालू करण्यात आली आहे. नियम आणि अटी पाळून वारकर्‍यांना वारीसाठी संमती मिळावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली.

पिंगुळी येथे आज प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा

पिंगुळी येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा ३६ वा पुण्यतिथी सोहळा ३१ जानेवारी २०२१ या दिवशी त्यांच्या येथील समाधी मंदिरात साजरा होणार आहे.

पर्ये येथील साठी-सत्तरीची देवी श्री भूमिकादेवीचा आज जत्रोत्सव !

सत्तरी तालुका आणि सांखळी ग्राम यांना आपल्या कृपाछत्राखाली घेतलेल्या श्री भूमिकादेवीचा वार्षिक कालोत्सव (जत्रोत्सव) पौष कृष्ण पक्ष द्वितीया (३०.१.२०२१) या दिवशी साजरा होत आहे. यानिमित्त देवीचे माहात्म्य सांगणारा हा लेख !

१ ते ९ मार्च कालावधीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार !

मनसे ‘मराठा राजभाषा’ दिवस सण आणि उत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करणार आहे.