कुडाळ – पिंगुळी येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा ३६ वा पुण्यतिथी सोहळा ३१ जानेवारी २०२१ या दिवशी त्यांच्या येथील समाधी मंदिरात साजरा होणार आहे. शासनाचे कोरोनाविषयीचे नियम पाळून भाविकांनी या पुण्यतिथी सोहळा, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांनी केले आहे.
३१ जानेवारी या दिवशी पहाटे ५ वाजल्यापासून काकड आरती, प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधीस्थानी अभिषेक आणि एकादशणी, प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांची पाद्यपूजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची महाआरती, १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद, १ वाजल्यापासून विविध भजन मंडळांचा भजनांचा कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता श्रींची सांजआरती, पालखी मिरवणूक सोहळा, रात्री ११ वाजता दशावतारी नाट्यप्रयोग, असे कार्यक्रम होणार आहेत.